पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला लागली भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:27 PM2018-11-14T12:27:32+5:302018-11-14T13:21:54+5:30

पुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात बुधवारी सकाळी एका जिमला आग लागली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

Dangerous fire in swimming pool in Dhankawadi area of ​​Pune | पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला लागली भीषण आग

पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला लागली भीषण आग

googlenewsNext
ठळक मुद्देअग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखलआगीचे कारण अद्याप अस्पष्ट

पुणे: पुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे स्वरुप भीषण असल्याने धुराचे लोण रस्त्यावरुन दिसत आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती समोर येत आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील हत्ती चौकात हा तलाव असून तिथे तसेच या आगीत एक मोटार देखील भस्मसात झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अगोदर तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. आगीचे प्रमाण मोठे असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी थोडा वेळ लागत आहे.
 परंतु, त्या दरम्यान रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. (सविस्तर माहिती लवकरच)   

Web Title: Dangerous fire in swimming pool in Dhankawadi area of ​​Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.