शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दहिहंडी उत्सव दणक्यात! सिनेतारकांची उपस्थिती; स्पीकरचा दणदणाट, शहरभर फ्लेक्सबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:08 IST

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच दहिहंडीच्या आडाने होणारे शक्ति प्रदर्शन यंदा दणक्यात

धनकवडी : भगवान श्रीकृष्णांने मथुरेला जाणारे दहीलोणी गोकुळच्या बालकांना मिळावे, या भूमिकेतून दहीहंडी रचली. मात्र आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच दहिहंडीच्या आडाने होणारे शक्ति प्रदर्शन यंदा दणक्यात होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

निवडणुका समोर असताना साजरे होणाऱ्या सर्व उत्सवांचा डामडौल औरच असतो. निवडणुकांशिवाय येणारे उत्सव साजरे करताना मात्र कार्यकर्त्यांना अग्नी दिव्यातून जावे लागते. शहरासह दक्षिण उपनगरात साजरी होणारी दहिहंडी म्हणजे निवडणुकांची सराव परिक्षा असते. कोरोनानंतर सण, आणि सार्वजनिक उत्सव धुम धडाक्यात आणि मोठ्या जल्लोषात साजरे होत असताना विनासायास मिळणारी रसद दहिहंडी मंडळांसाठी पर्वणी ठरत आहे.  दहीहंडीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून शहरभर दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली आहे.

सिनेतारकांची उपस्थिती, दहीहंडी पथकांवर देण्यात येणारी बक्षिसे, विद्युत रोषणाईवर लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. कोरोना संसर्गामुळे गेले दोन वर्षे सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध होते. राज्य शासनाने सार्वजनिक सणांवरील निर्बंध मागे घेतल्यानंतर यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी तयारी सुरू केली आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना भरीव सहाय करण्यासाठी इच्छुक आघाडीवर असून दहीहंडी उत्सवापूर्वी शहरभर फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. 

दहीहंडीचा उत्सव शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत होता. मात्र मागील काही वर्षांपूर्वी उपनगरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाश योजनेंवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवाला काही मंडळां कडून विधायक उपक्रमांची जोड देण्यात येत असून दहीहंडी उत्सवावर होणारा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. हि कौतुकास्पद बाब आहे.

टॅग्स :DhankawadiधनकवडीDahi HandiदहीहंडीMONEYपैसाartकलाmusicसंगीतPoliticsराजकारण