शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

हिनादीदी, आमच्या गँगची लिडर म्हणत 'राडा'; पुण्यात पुरुषांप्रमाणे महिला गुंडांची टोळी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 18:20 IST

'तू आम्हाला ओळखत नाही का ? आमच्यासोबत हिना दीदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे.''

पुणे: शहरात पुरूषांच्या गँगप्रमाणे एका महिलेची टोळी देखील सक्रिय झाली असून, खडकी परिसरात या टोळीने दहशत पसरवली आहे. ’तू  आम्हाला ओळखत नाही का ? आमच्यासोबत हिना दीदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे.तिच्या परवानगीशिवाय वस्तीत गाडी आणायची नाही, महादेववाडी हिना दीदीच्या मालकीची आहे. परत गाडी आणली तर खल्लास करून टाकीन अशी धमकी देत एका व्यक्तीच्या घरी जावून तलावर, कोयत्याने दरवाज्यावर मारून परिसरात सशस्त्र दहशत निर्माण केल्याचा प्रकार महादेववाडी खडकी येथील आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात गुरुवारी (दि.21) घडला आहे.

याप्रकरणी खडकी पोलिसांनी रिना उर्फ हिना तायडे (वय.24,रा. महादेववाडी) हिला अटक केली असून, तिचे इतर दोन साथीदार अनुक्रमे सोन्या गोपनारायण आणि लोहार यांच्यावर आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित प्रकाश काची (वय.36) यांनी फिर्याद दिली आहे. महिलेकडून टोळी चालविली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काची हे खडकी परिसरातील एका कपड्याच्या दुकानात काम करतात. गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास ते पत्नी आणि मुलासह नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी निघाले होते. आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात गाडी आली असता, हिना व तिच्या इतर दोन साथीदारांनी त्यांना अडवले.त्यानंतर एका मुलाने त्याच्या शर्टमध्ये लपवलेला कोयता काढून तू आम्हाला ओळखत नाही का ? आमच्या सोबत हिना दिदी आहे. ती आमच्या गँगची लिडर आहे. तिच्या परवानगी शिवाय वस्तीत गाडी आणायची नाही, महादेववाडी हिना दिदीच्या मालकीची आहे. परत गाडी आणली तर खल्लास करून टाकील अशी धमकी त्याने दिली.त्यावेळी घाबरून जात काची यांनी गोपनारायण याला  ढकलून दिले. त्यानंतर हिना व तिच्या साथीदारांनी रात्री आठ च्या सुमारास काची राहत असलेल्या परिसरात  राडा घातला. आवाज आल्याने काची यांच्या घरातील लोकांनी बाहेर येऊन पाहिले. ’तुमचा मुलगा कुठं आहे? असे विचारून आज त्याला जिवंत सोडणार नाही असा दम दिला. तेव्हा त्यांनी घाबरून मुलगा घरात नसल्याचे सांगितले. यानंतर तिघांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाज्यावर तलावर,कोयत्याने मारले.  तसेच परत जाताना परिसरातील लोकांना आमचे ऐकत नसाल तर एकेकाला खल्लास करू अशी धमकी देत हातातील शस्त्रे हवेत फिरत दहशत निर्माण केली. घाबरलेल्या लोकांनी घराच्या-खिडक्या व दरवाजे बंद केले. दरम्यान, झालेल्या प्रकाराची माहिती फिर्यादी यांच्या घरच्यांनी त्यांना फोनद्वारे दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. -----------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाArrestअटक