शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमाच्या गाण्यावर नृत्य? वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रम वादात; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:28 IST

‘जंगल का राजा हिडमा’ सादरीकरणानंतर खळबळ; प्रशासन सतर्क

पुणे : विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “ओ रे बंदूक वाले” या गाण्यावर नृत्य सादर केले. संबंधित गाण्यात माओवादी कमांडर माडवी हिडमा याचे कथित गौरवगान असल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अधिकच्या माहितीनुसार, सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान ‘जंगल का राजा हिडमा’ या नावाचे नाट्यसादरीकरणही करण्यात आले होते. गाण्यातील “वापस आजा हिडमा, जंगल के चोरों ने घेरा हिडमा, ग्रीन हंट की बंदूक ने मारा हमको” या ओळींमुळे कुख्यात माओवादी नेत्याचे उदात्तीकरण होत असल्याची चर्चा सुरू झाली. या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. या घटनेची दखल पुणे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि समाजकल्याण विभागाने घेतली आहे. या प्रकरणामागे कोणत्याही नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव आहे का ?  तसेच शहरातील तरुणांना दहशतवादी कृत्यांकडे वळविण्याचा कोणताही कट होता का ? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.माध्यमांशी बोलतांना समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे गाणे विद्यार्थ्यांकडून अनवधानाने निवडले गेल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या गाण्यांमधून केवळ त्याचे संगीत आवडल्यामुळे त्याची निवड केली होती. या सादरीकरणासाठी कोणतीही पूर्वतयारी नव्हती आणि अवघ्या दहा मिनिटांत हा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. कार्यक्रमाचा उद्देश पूर्णपणे सांस्कृतिक होता. 

विविध भागांतील पारंपरिक पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. या वसतिगृह परिसरात एकूण सात हॉस्टेल्स असून सुमारे १,००० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. परीक्षेनंतर सुमारे ६०० ते ७०० विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी सुमारे ८५ टक्के विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. दरम्यान, घटनेनंतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना या प्रकाराचे गांभीर्य समजावून सांगितले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच, कार्यक्रमासाठी आवश्यक अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती, ही बाबही तपासात समोर आली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune hostel dance on Maoist commander's song sparks controversy, investigation.

Web Summary : Pune hostel's cultural program featuring a song allegedly glorifying Maoist commander Hidma sparked controversy. Police are investigating possible Naxal links. Officials claim students unknowingly chose the song, focusing on its music. Counseling and investigation are underway.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या