३ कोटी, मारहाण,‘त्या’ नोटमध्ये धक्कादायक खुलासे..!विवेक गटणे प्रकरणात १३ आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:09 IST2026-05-13T13:03:50+5:302026-05-13T13:09:10+5:30

Crime News - व्यवहारातील पैसे परत मागितल्यावर विवेक गटणे यांना वेळोवेळी मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Crime News 3 crores, assault, shocking revelations in 'that' suicide note..! 13 accused absconding in Vivek Gatne case | ३ कोटी, मारहाण,‘त्या’ नोटमध्ये धक्कादायक खुलासे..!विवेक गटणे प्रकरणात १३ आरोपी फरार

३ कोटी, मारहाण,‘त्या’ नोटमध्ये धक्कादायक खुलासे..!विवेक गटणे प्रकरणात १३ आरोपी फरार

दौंड : येथील माजी मुद्रांक विक्रेते तथा ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष विवेक गटणे (वय ७२, रा. दौंड) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी विशेष शोधपथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

याप्रकरणी संजय बारवकर, आरिफ शेख, प्रकाश भालेराव, अख्तर शेख, राजू बारवकर, शंकर वाघमारे (सर्व रा. दौंड), आदित्य जगताप (रा. पुणे) तसेच शितोळे, सोनवणे, चोप्रा, कुलकर्णी मॅडम, शिंदे आणि मुल्ला (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात, रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. ११) रोजी पहाटे विवेक गटणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाइड नोटमधून संबंधित आरोपींची नावे समोर आली.

गेल्या एक वर्षापासून आरोपींनी एका फायनान्स कंपनीतील ओळखीच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत विवेक गटणे यांच्याकडून वेळोवेळी पैसे, सोने आणि इतर मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र, त्या परत न करता त्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे विवेक गटणे यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तीन कोटींच्या व्यवहाराची चर्चा

या प्रकरणातील काही आरोपी दौंड शहरातील असून त्यांचे विवेक गटणे यांच्यासोबत निकटचे संबंध होते. आरोपी आणि गटणे यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे. काही व्यवहार सोन्याच्या स्वरूपातही झाले असून एकूण व्यवहार सुमारे तीन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. व्यवहारातील पैसे परत मागितल्यावर विवेक गटणे यांना वेळोवेळी मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सुसाइड नोटमधून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title : दौंड: सुसाइड नोट में चौंकाने वाले खुलासे; 13 आरोपी फरार।

Web Summary : दौंड में विवेक गटणे की आत्महत्या: 13 लोगों द्वारा वित्तीय शोषण और उत्पीड़न का खुलासा। सुसाइड नोट में पैसे, सोने और शारीरिक शोषण की मांगों का विस्तृत विवरण है, जिसके कारण उनकी दुखद मौत हुई। पुलिस तीन करोड़ के लेनदेन की जांच कर रही है।

Web Title : Daund: Suicide note reveals shocking truths; 13 accused absconding.

Web Summary : Vivek Gatne's suicide in Daund reveals financial exploitation and harassment by 13 individuals. A suicide note detailed demands for money, gold, and physical abuse, leading to his tragic death. Police are investigating a three-crore transaction.