शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला यूएईमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:11 IST

पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ रुपये लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील भारतातील रुपे कार्डमार्फत झालेल्या ...

पुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ रुपये लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील भारतातील रुपे कार्डमार्फत झालेल्या

अडीच कोटी रुपयांच्या फसवणुकीतील टोळी प्रमुखाला संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोलिसांनी अटक केली.

सुमेर शेख (वय २८, सध्या रा. दुबई, मूळ रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी

केंद्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करुन जगभरातील २८ देशांतून ९४ कोटी ४२ लाख रुपये काढण्यात आले होते. त्यासाठी परदेशात व्हिसा-डेबिट कार्डचा वापर करण्यात आला होता. तर, भारतात रुपे कार्डचा वापर केला गेला होता.

देशातील १७ शहरांमधील एटीएममधून अडीच कोटी रुपये काढण्यात आले होते. हे क्लोन केलेले रुपे कार्ड सुमेर शेख याने आपली पत्नी व नातेवाईकांमार्फत देशभरातील साथीदारांना पुरविले होते. पुणे पोलिसांनी सुमेर शेख याची पत्नी व इतर अशा १२ जणांना आतापर्यंत अटक केली आहे.

काँसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला प्रकरणात सुमेर शेख याचा सहभाग होता. त्याने या गुन्ह्याचा कट रचल्याचे तसेच नियोजनबद्धरित्या बँकेच्या ग्राहकांची माहिती डार्क वेबवरुन विकत घेणे, बनावट डेबिट कार्ड तयार करणे, साथीदारांना डेबिट कार्डचे वाटप करणे़ त्यांच्याकडून रोकड काढण्यास सांगणे, अशा पद्धतीने त्याने गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. शेख याचा सहभाग आढळून आल्यानंतर इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस बजावली होती.

कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीचवर ११ आणि १३ ऑगस्ट २०१७ रोजी सायबर हल्ला करुन बँकेतील ९४ कोटी ४२ लाख रुपये काढून घेण्यात आले होते. हाँगकॉगमधील हेनसेंग बँकेत आरोपींनी १२ कोटी रुपये वळवले होते. ते गोठविण्यात पुणे पोलिसांना यश मिळाले होते. त्यापैकी ६ कोटी रुपये काँसमॉस बँकेला आतापर्यंत परत मिळाले आहेत.

याबरोबरच परदेशातील कॅनडा व अन्य देशातील संशयित सायबर चोरट्यांच्या तपासासाठी आयबी, सीबीआयमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे.