Corona Virus News : 228 new corona infestations in Pune city on Saturday; 258 patients were cured | Corona Virus News : पुणे शहरातील शनिवारी दिवसभरात २२८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; २५८ रुग्ण झाले बरे

Corona Virus News : पुणे शहरातील शनिवारी दिवसभरात २२८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; २५८ रुग्ण झाले बरे

ठळक मुद्देसक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ७५

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात २२८ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ७५ झाली आहे. 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २९६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. तर, पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७३५ झाली आहे. दिवसभरात एकूण २५८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७७ हजार ६६४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८४ हजार ४७४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ७५ झाली आहे.   
-------------   
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७४२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख १३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus News : 228 new corona infestations in Pune city on Saturday; 258 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.