शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सावधान! कोरोनाच्या नावाखाली तुमची फसवणूक होत असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 14:19 IST

नफ्याचा नव्हे माणुसकीचा विचार दुकानदाराने करावा 

ठळक मुद्देमाल खरेदी करताना ग्राहकांनी घ्यावी काळजी चढ्या दराने वस्तूंची विक्री करत असल्यास होणाऱ्या फसवणुकीपासून राहावे लागणार जागरूक

पुणे : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शहर लॉकडाऊन आहे. नागरिकांना संचारबंदी आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि किराणा मालाची दुकाने सुरू आहेत. एकीकडे नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी प्रशासकीय दृष्टीने काळजी घेण्यात आहे. मात्र दुसरीकडे ग्राहकाला जीवनावश्यक वस्तू बरोबर इतर मालाची खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषत: पॅकिंग केलेल्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासून बघणे, निकृष्ट दर्जाचा किराणा माल खरेदी करावा लागणे, याशिवाय परिस्थितीचा फायदा घेऊन जो कुणी दुकानदार चढ्या दराने वस्तूंची विक्री करत असल्यास होणाऱ्या फसवणुकीपासून जागरूक राहावे लागणार आहे. एखाद्या दुकानदाराकडून फसवणूक होत असल्यास काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देताना पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर म्हणाले, कोरोनामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारे दुकाने सुरू आहेत. 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन असल्याने ग्राहक एकदम काही वस्तूंची खरेदी करून ठेवत आहेत. अशावेळी ज्या वस्तू खरेदी केल्या आहेत त्यांची एक्सपायरी डेट त्यांनी तपासण्याची गरज आहे. किराणा मालाचा जो जुना साठा आहे तो ग्राहकांपर्यत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी ग्राहकांनी सावध राहावे. सध्या तक्रार करण्यासाठी त्यांना अडचणी येऊ शकतात. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर ते सबंधित दुकानदाराविरोधात तक्रार करू शकतात. दुकानदाराने सहकार्य करण्याची गरज आहे. अशावेळी त्यांनी आर्थिक फायद्याकडे न पाहता ग्राहकांच्या हिताचा विचार करावा. माणुसकीच्या दृष्टिकोनातून तो व्यवहार कसा होईल याकडे लक्ष द्यावे. याउलट जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणा?्या विक्रेत्यांनी नफा कमी करून सेवा द्यायला हवी. 

     ग्राहकाने काय करावे..?- ग्राहकांनी आपल्याला नेमक्या कुठल्या जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे त्याची यादी करावी. (उदा.तेल, डाळी, साखर, इतर किराणा माल ) खरेदी शक्यतो एकदाच करण्यावर भर द्यावा. म्हणजे घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही. 

- ज्या वस्तूची खरेदी केली आहे त्याचे बिल दुकानदाराकडून घेणे गरजेचे आहे. यामुळे ज्या वस्तुविषयी शंका आहे त्याच्या विरोधात दुकानदाराला जाब विचारता येईल. यामुळे संबंधित दुकानदार किती दराने मालाची विक्री करत आहे हे कळण्यास मदत होईल.

- विशेषत: पॅकिंग केलेल्या ज्या वस्तू आहेत त्यावरील मुदत दिनांक तपासून पाहावे. ज्यावेळी न्यायालयाचे कामकाज सुरू होईल त्यावेळी दाद मागता येईल. तसेच शासनाने जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे त्यांना विचारणा करता येईल.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसfoodअन्नvegetableभाज्याMarketबाजार