शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या 'आदरांजली' योजनेवरही कोरोनाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 11:34 IST

लॉकडाऊन काळात ही कपात न झाल्याने या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी ही मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण

पुणे : सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या आदरांजली योजनेवरही कोरोनाचे सावट आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनच प्रत्येकी ५० रुपये घेतले जातात. पण लॉकडाऊन काळात ही कपात न झाल्याने या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी ही मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वारसदारांसाठी आदरांजली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत स्वेच्छेने सुमारे ८ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याच्या वेतनातून योजनेसाठी ५० रुपये कपात करणे अपेक्षित होते. ही रक्कम निधन झालेले कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसदारांना दिली जाणार आहे. पण लॉकडाऊनमुळे पीएमपीची बससेवा ठप्प होती. अनेक कर्मचाºयांना वेतनही मिळाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कपात करण्यात आली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या वेतनापासून ही कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक कामगार अधिकारी सतिश गाटे यांनी काढले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात चार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून २०० रुपये कपात केली जाणार आहे.

फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीतही काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. या कर्मचाऱ्यांना आदरांजली योजनेचा लाभ मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या कालावधीत अनेक कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळाले नाही, अनेकांना कामही नव्हते. त्यामुळे ५० रुपये कपात करता आले नाहीत. त्यामुळे या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत संभ्रम आहे. गाटे यांनीही याला दुजोरा दिला. लॉकडाऊन काळात काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. त्यांनाही योजनेचा लाभ द्यायचा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मोठी रक्कम कपात करावी लागेल. त्यामुळे याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे गाटे यांनी सांगितले.
----------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूEmployeeकर्मचारी