शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघातप्रकरणी विमान कंपनीच्या संचालकांची सीआयडीकडून चाैकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:29 IST

Ajit Pawar Plane Crash विमानाची ऑपरेशन प्रक्रिया, मेंटेनन्स रेकॉर्ड, तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन, अपघाताशी संबंधित अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली 

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानअपघात प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. अजित पवार यांचा बारामतीतविमानअपघातात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानातून निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत आले होते. सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना अपघात झाला. या अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू झाला. विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. बारामती पोलिस ठाण्यातील दाखल प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर वैमानिक, तसेच वैमानिकाचा हलगर्जीपणा किंवा घातपात असा संशय व्यक्त केला असताना आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन विमान कंंपनीवर गंभीर आरोप केले होते. डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन), तसेच एएआयबी (एअरक्राफ्ट ॲक्सिडेन्ट इन्व्हीस्टीगेशन ब्युरो) यांच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ५) व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. व्ही. के. सिंग हे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहित यांच्यासह सीआयडीच्या पाषाण रस्त्यावरील कार्यालयात आले. ‘विमानाची ऑपरेशन प्रक्रिया, मेंटेनन्स रेकॉर्ड, तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन, अपघाताशी संबंधित अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आली’, अशी माहिती सीआयडीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Plane Crash: VSR Company Director Questioned by CID

Web Summary : CID investigated VSR company director V.K. Singh regarding Ajit Pawar's plane crash that killed Pawar and others. Rohit Pawar alleged company negligence. The inquiry covered operational procedures, maintenance, and safety compliance.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाairplaneविमानBaramatiबारामतीDeathमृत्यूAccidentअपघातCriminal Investigation Department CIDराज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी