चाकणमधील खालुंब्रेत बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरून हत्या; आरोपीला बारा तासांत ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 21:32 IST2026-05-02T21:32:41+5:302026-05-02T21:32:55+5:30

या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे.

Child brutally tortured and murdered in Chakan Accused arrested within twelve hours | चाकणमधील खालुंब्रेत बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरून हत्या; आरोपीला बारा तासांत ठोकल्या बेड्या

चाकणमधील खालुंब्रेत बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरून हत्या; आरोपीला बारा तासांत ठोकल्या बेड्या

चाकण : औद्योगिक क्षेत्रातील खालुंब्रे (ता. खेड) येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय मुलाकडून केवळ तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना (दि. १ मे २०२६) चाकण औद्योगिक क्षेत्रातील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत शोधमोहीम सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, नागरिकांकडून चौकशी करणे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास वेगाने पुढे नेण्यात आला. या शोधादरम्यान शेजारील एका खोलीत संशयास्पद स्थितीत ठेवलेल्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये त्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला.

हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. संबंधित बालकावर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तातडीने तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक माहिती, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी हा मूळचा बिहार राज्यातील असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी स्वतःही अल्पवयीन आहे.

गुन्हा केल्यानंतर तो राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी वेगाने हालचाल करत पुणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संपूर्ण घटनेचा तपशील उलगडण्याचे काम सुरू आहे.
 

Web Title : चाकण: नाबालिग ने 3 वर्षीय बच्चे का यौन उत्पीड़न कर हत्या की, गिरफ्तार

Web Summary : चाकण में एक 16 वर्षीय लड़के को 3 वर्षीय बच्चे का यौन उत्पीड़न करने के बाद बेरहमी से हत्या करने के आरोप में गिरफ्तार किया गया है। पुलिस ने आरोपी को पुणे रेलवे स्टेशन से 12 घंटे के भीतर भागने की कोशिश करते हुए पकड़ लिया। घटना से आक्रोश है।

Web Title : Chakan: Minor arrested for sexually assaulting, murdering 3-year-old child.

Web Summary : A 16-year-old has been arrested in Chakan for the brutal murder of a 3-year-old after sexually assaulting the child. Police apprehended the suspect within 12 hours at Pune railway station as he attempted to flee. The incident has sparked outrage.