शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी सोडल्या कोंबड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 13:10 IST

शिवसैनिकांचा संताप लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला बाहेर पोलीस बंदोबस्त

ठळक मुद्दे राणेंवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. पुणे शहरातही शिवसैनिक आक्रमक झाले असून जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात त्यांनी कोंबड्या सोडल्या आहेत. हीच राणेंची लायकी आल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

''आता तरी आम्ही पुण्यातल्या भाजप कार्यलयात घुसलो आहोत. वेळ आल्यास भारतीय जनता पार्टीचे ऑफिसही फोडून टाकू. असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे.''

शिवसैनिकांचा संताप लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आज गुडलक चौकात कोंबड्यांसह आंदोलन केले असून डेक्कन जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्याचा राज्यभरात निषेध होत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या वक्तव्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  शिवसैनिक रोहित कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन 

''मोदी साहेबांना विनंती आहे की असे उद्योग करणाऱ्यांना लवकरात लवकर मंत्रीपदावरून पाया उतार करावा.  राज्याच्या मुख्यमंत्री विरोधात भाषण केले.  शासनाने कठोर कारवाई करावी. असे कार्यकर्ते म्हणाले आहेत.''

''भाजपने खासदारची तुकडा टाकला त्यावर तो बडबड करतोय,तो स्वतःच्या मतदार संघात निवडून येऊ शकत नाही, हीच त्याची लायकी आहे. केंदीय मंत्र्याने असे वक्तव्य करणं शोभत नाही. राणेंवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.''

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणेBJPभाजपाShiv Senaशिवसेना