शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Census of India 2027: यंदाच्या जनगणनेत नागरिकांना प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध; स्वतंत्र पोर्टलची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:12 IST

Census of India 2027 जास्तीत जास्त नागरिकांनी स्वगणनेत दिनांक १ ते १५ मे या कालावधीत माहिती भरून जनगणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

पुणे : भारताची जनगणना २०२७ चे पुणे महापालिका क्षेत्रातील कामकाज हे दोन टप्प्यात होणार असून घरांची यादी व घरांची गणना हे पहिल्या टप्प्याचे कामकाज दिनांक १ मे ते १४ जून या कालावधीत होणार आहे. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जास्तीत जास्त नागरिक यांनी स्वगणनेत दिनांक १ ते १५ मे या कालावधीत माहिती भरून जनगणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

पुणे महापालिकेने https://Se.census.gov.in या स्वतंत्र पोर्टल ची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रसाठी ते १ मे ते १५ मे कालावधी करता उपलब्ध राहील. नागरिकांना आपली माहिती स्वतः भरता येणार आहे. प्रथम नागरिक नोंदणी करून विचारलेल्या ३४ प्रश्नांची माहिती भरून ती सबमिट केल्यानंतर नागरिकांना स्वगणना होणार आहे. आयडी नागरिकांनी जतन करून ठेवावा १६ मे ते १४ जून या कालावधीत येणारे जनगणना अधिकारी अथवा प्रगणक यांना घरांना भेट देतेवेळी उपलब्ध करून देण्यात यावा. भारताची जनगणना ही जगातली सर्वोत्तम जनगणना पैकी एक असून तिला समृद्ध परंपरा लाभली आहे ती जगातील सर्वात मोठ्या उपक्रमापैकी एक आहे भारतात पहिली जनगणना १८७२ मध्ये करण्यात आली होती. ती देशाच्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या वेळी करण्यात आली होती. १९८१ मध्ये संपूर्ण देशात एकाच वेळी जनगणना करण्यात आली . १९८१ पासून जनगणना ही दर १० वर्षांनी करण्यात येत असून २०२७ ची जनगणना ही या शृंखलेतील १६ वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची ८ वी गणना आहे.जनगणना २०२७ या गणनेत प्रथमच मोबाईल ॲप व्दारे डिजिटल माध्यमातून माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गटातील प्रत्येक घरांना दिनांक १६ मे ते १४ जून या कालावधीत भेट देऊन माहिती संकलित करतील त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असेल.

दुसऱ्या फेरीचे कामकाज हे फेब्रुवारी २०२७ मध्ये केले जाणार आहे. डिजिटलच्या युगात भारताच्या जनगणना संचालनालयाकडून नागरिकांना त्यांची पहिल्या टप्प्यातील घरयादी व घराची गणना संबंधित माहिती थेट ऑनलाईन माध्यमातून गोपनीयरित्या भरून भारताच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आकडेवारी देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जास्तीत जास्त पुणेकर नागरिक यांनी स्वगणनेत दिनांक १ ते १५ मे या कालावधीत माहिती भरून जनगणनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India Census 2027: Citizens Can Now Self-Enumerate; Portal Created

Web Summary : Pune's 2027 census offers self-enumeration (May 1-15) via a new portal. Citizens register, answer 34 questions, and provide the ID to census officials visiting homes (May 16-June 14). This digital census ensures confidentiality and aids India's economic development.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजन