शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दोन कंटेनरमध्ये कार सापडून आगीचे तांडव, नवले पूल परिसरात अपघात; ३ वर्षांच्या चिमुकलीसह ८ ठार, २२ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:56 IST

Navale Bridge Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पूल  परिसरात झालेल्या भीषण अपघाताने गुरुवारी शहर हादरले. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच ८ जण जळून खाक झाले, तर २० ते २२ जण जखमी झाले.

पुणे - पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पूल  परिसरात झालेल्या भीषण अपघाताने गुरुवारी शहर हादरले. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच ८ जण जळून खाक झाले, तर २० ते २२ जण जखमी झाले. मृतांमध्ये ३ वर्षांची चिमुकलीही आहे. मृतांपैकी ६ जणांची ओळख पटली आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. 

प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’ला सांगितले, की एक कंटेनर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले. यामुळे कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने १० ते १५  वाहनांना जोरदार धडक दिली, त्यात ट्रॅव्हलर बस पलटी झाली. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणात आगीचे लोट आकाशात झेपावले. यादरम्यान, सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. त्यानंतर कार पुढील दुसऱ्या कंटेनरमध्ये अडकली आणि तिनेही पेट घेतला.

सीएनजीचा स्फोट?प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरने कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारमधील सीएनजी सिलिंडरचाही स्फोट झाला. त्यामुळे आग भडकली. कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही.

आग लागली अन् काही क्षणांतच झाला कोळसाआगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग खाक झाला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनरचालक आणि त्याचा क्लीनर यांचादेखील होरपळून मृत्यू झाला. पाच ते सात मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. 

वाहतूक पूर्णपणे ठप्पघटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. घटनास्थळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

नवले पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. अपघाताच्या काही मिनिटे आधीच मी तेथून जात होतो. एका कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो तीव्र उतारावरून अनेक वाहनांना धडक देत आला. कार व दुसऱ्या ट्रकला जाऊन धडकला. त्या दोन्ही ट्रकच्या मध्ये कार आल्याने त्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कार आणि ट्रकमधील प्रवासी पूर्णपणे जळून खाक झाले. अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पण, ट्रकनेही पेट घेतल्याने त्यातील लोकांना बाहेर काढणे शक्य झालं नाही.- अक्षय दीक्षित, प्रत्यक्षदर्शी

मृत पुणे परिसरातीलचअपघातग्रस्त कारमधील मृत पाचजणांची ओळख पटली असून, ते सर्व पुण्यातील धायरी आणि पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील रहिवासी आहेत. पुण्याजवळील नारायणगाव येथून ते परत येत होते. दत्तात्रय दाभाडे, त्यांची पत्नी शांता दाभाडे, मुलगी स्वाती नवलकर, मोक्षिता रेड्डी, चालक धनंजय कोळी आणि रोहित ज्ञानेश्वर कदम अशी मृतांची नावे आहेत. मोक्षिता ही नवलकर यांच्या शेजाऱ्याची मुलगी होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Accident: Container Fire Kills Eight, Including Child, Injures Many

Web Summary : A horrific accident near Navale Bridge in Pune involving containers and a car resulted in eight fatalities, including a three-year-old child, and 22 injuries. A container truck's brake failure led to a collision and subsequent fire, engulfing vehicles. Victims were charred beyond recognition, causing massive traffic disruption.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात