बंगल्यातच गांजाची शेती! पुण्यात तरुणाचा कारनामा उघड; ४१ गांजाची झाडे आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

By किरण शिंदे | Updated: April 28, 2026 20:21 IST2026-04-28T20:20:19+5:302026-04-28T20:21:19+5:30

तरुणाने हा बंगला भाड्याने घेतला होता आणि त्याच ठिकाणी गांजाची शेती करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

Cannabis cultivation in a bungalow! A young man's exploits exposed in Pune; 41 cannabis plants and goods worth lakhs seized | बंगल्यातच गांजाची शेती! पुण्यात तरुणाचा कारनामा उघड; ४१ गांजाची झाडे आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

बंगल्यातच गांजाची शेती! पुण्यात तरुणाचा कारनामा उघड; ४१ गांजाची झाडे आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे: पुण्यातील लोहगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने थेट बंगल्याच्या आवारात गांजाची शेती करत विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी छापा टाकत तब्बल ४१ गांजाची झाडे आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पुण्याच्या लोहगावातील पठारे वस्ती भागात ही कारवाई करण्यात आली. एका बंगल्यात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकला असता, थेट गार्डनमध्ये गांजाची लागवड केल्याचं उघड झालं. लहान-मोठी अशी तब्बल ४१ गांजाची झाडे पोलिसांना आढळून आली.

या झाडांचे एकूण वजन सुमारे साडेचार किलो इतके असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याने हा बंगला भाड्याने घेतला होता आणि त्याच ठिकाणी गांजाची शेती करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

इतकंच नाही, तर आरोपीकडील वाहनातूनही गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच गांजाची विक्री करण्यासाठी वापरले जाणारे तब्बल ९ मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. लोहगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मोबाईलद्वारे गांजाची विक्रीचं नेटवर्क चालवलं जात होतं का, याचा तपास पोलिस करत आहेत.

 

Web Title : बंगले में गांजे की खेती! पुणे में युवक उजागर; 41 पौधे जब्त

Web Summary : पुणे में एक किराए के बंगले के बगीचे में गांजे की खेती करते एक युवक को गिरफ्तार किया गया। पुलिस ने 6 लाख रुपये के 41 पौधे और वितरण के लिए इस्तेमाल किए गए नौ मोबाइल फोन जब्त किए। नेटवर्क का पता लगाने के लिए जांच जारी है।

Web Title : Ganja Farm in Bungalow! Pune Youth Exposed; Seized 41 Plants

Web Summary : Pune youth arrested for cultivating cannabis in a rented bungalow's garden. Police seized 41 plants, worth ₹6 lakhs, and nine mobile phones used for distribution. Investigation underway to uncover the network.