शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; कर्वे रस्ता, महम्मद वाडी आणि विश्रांतवाडी भागात ३ घटना

By नम्रता फडणीस | Updated: July 10, 2024 19:03 IST

अज्ञात चोरटयांविरुद्ध डेक्कन, वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, दोन दिवसात कर्वे रस्ता, महम्मद वाडी भागात घरफोडी तर विश्रांतवाडी मध्ये वाईन्स शॉप लुटल्याच्या तीन घटना घडल्या. याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध डेक्कन, वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     कर्वे रस्त्यावरील दाणे बंगला कुलूप लावून बंद करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने घराचे लोखंडी गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधील कपाटात ठेवलेले १३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे हि-याचे दागिने चोरी केले. ही घटना दि. ७ जुलै रोजी रात्री ७. १५ ते ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. एका ८४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करीत आहेत.     महम्मद वाडी येथील आशीर्वाद पार्क येथे दि. ७ जुलै रोजी सकाळी ९.३० ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान दुसरी घरफोडीची घटना घडली. एका ४६ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादींनुसार, अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप कशाच्या साहाय्याने उचकटून त्याद्वारे आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूमच्या कपाटातील ३ लाख ५० लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. विश्रांतवाडी मध्ये चोरटयांनी वाईन्स शॉप लुटल्याची तिसरी घटना घडली. दि. ८ जुलै रोजी रात्री १०. ते दि. ९ जुलै रोजी सकाळी ९. १५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी एका ५६ वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे अनुराग कॉम्प्लेक्स मध्ये वाईन शॉप आहे. अज्ञात चोरट्याने वाईन्स शॉप चे लोखंडी शटर तोडून दुकानाच्या ड्रॉवर मधील ६४ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच बॉटल सिल्व्हर कॉईन व इतर साहित्य असा एकूण २ लाख ७९ हजार ८४५रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेHomeसुंदर गृहनियोजनPoliceपोलिसMONEYपैसाFamilyपरिवार