शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

एटीएम कार्ड क्लोनिंग करून लाखोंचा अपहार करणारे ‘बंटी बबली’ गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 20:14 IST

क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन कार्ड तयार केले. स्कँनर आणि स्पाय कँमे-याच्या साहयाने फसवणूक करणा-या नायजेरियन युवक-युवतीला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्दे१९ बँकांचे क्रेडिट व डेबिट कार्ड यासह इतर मुद्देमाल जप्त एटीएम मधून पैसे चोरण्याची ट्रीक पुढील तपासातून या आरोपींकडून लाखोंची फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता

पुणे : क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन कार्ड तयार केले. स्कँनर आणि स्पाय कँमे-याच्या साहयाने फसवणूक करणा-या नायजेरियन युवक-युवतीला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनी एकाच दिवसात बनावट कार्डच्या मदतीने प्रत्येक मिनिटाला दहा हजार याप्रमाणे ९२ हजारांचे ट्रान्झेक्शन केले. विशेष म्हणजे दोन्ही आरोपींनी व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेतली आहे.  याबाबत संबीतकुमार प्रमोद मिश्रा (४०, रा. वॉटरगेट सोसायटी, उंड्री, ) यांनी फिर्याद दिली होती. ईरमेहन स्टिवेन (३०) व उम्मु अयान महेबुब (२३) दोघेही मुळ रा. नायजेरिया) यांना याप्रकरणी अटक झाली आहे. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची माहिती दिली. फिर्यादीने तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस नाईक जयवंत चव्हाण व अमित साळुंके यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावरुन आरोपींची चौकशी करुन ते राहत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पहाटे त्या पत्त्यावर जाऊन त्यांना अटक केली. आरोपींकडून एटीएम कार्ड क्लोनिंग करण्याकरिता वापरण्यात आलेले 2 लँपटॉप, 2 स्कँनर, 1 कँमेरा, 2 पेनड्राइव्ह, इन्स्ट्रुमेंट पँड 1, ग्ल्यु गन 1, 62 बनावट एटीएम कार्ड, 2 सी डी डिक्स, 2 नेट डॉंगल, 5 मोबाईल हँंडसेट, व वेगवेगळ्या 19 बँकेचे क्रेडिट व डेबिट कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला. यापैकी एका आरोपीविरोधात खडकी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी गुन्हा दाखल झाला असून या दोन्ही आरोपींच्या माध्यमातून शहरातील अनेक एटीएम मध्ये होत असलेल्या चोरीच्या घटना समोर येण्यास मदत होणार आहे.  कोंढवा, येवलेवाडी, कात्रज, बिबवेवाडी, गोकुळनगर, साईनगर उंड्री, पिसोळी या परिसरातील नागरिकांनी विशेषत: एटीएमचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे व  खबरदारी म्हणून एटीएम कार्डच पिनकोड बदलण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी परिमंडळ 5 चे पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, पोलीस हवालदार राजस शेख, इकबाल शेख, विलास तोगे यांनी केली. 

* एटीएम मधून पैसे चोरण्याची ट्रीक ज्या एटीएम मधून पैसे चोरायचे आहेत त्या मशीनला स्पाय कँमेरा लावून ग्राहकाच्या हालचालीवर देखरेख ठेवली जायची. तसेच ज्याठिकाणी कार्ड स्वँप केले जाते त्याजागी मँग्नेटिक स्कँनर वापरुन ग्राहकाच्या एटीएम कार्ड संबंधी माहिती घेतली जात असे. त्यातून पासवर्ड मिळविला जायचा. ती माहिती लँपटॉपला कनेक्ट करुन त्याव्दारे बनावट कार्ड तयार केले जायचे. मग ते कार्ड स्कँन करुन स्पाय कँमे-यातून मिळालेला पासवर्ड टाकुन पैसे काढले जायचे.  कोंढव्यातील एटीएम फसवणूकीच्या घटनेत त्यांनी पुणे को ऑपरेटिव्ह व राजर्षी शाहु महाराज बँकेचे एटीएम वापरले. या गुन्हयातील नायजेरियन आरोपी युवकाने एमबीए तर युवतीने बीबीए ची पदवी घेतली आहे. यापूर्वी ते कपडे विकण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासातून या आरोपींकडून लाखोंची फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसatmएटीएमThiefचोर