शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे जम्बो रुग्णालये नंतर उभारा, आधी महापालिकेची बंद रूग्णालये सुरू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 18:56 IST

तात्पुरती जम्बो रुग्णालये उभी करण्याआधी प्रशासनाने पुणे शहरातील 8 ते 10 बंद अवस्थेतील रुग्णालये सुरु करावी..

ठळक मुद्देबंद रुग्णालये सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरातील विविध संघटनांची महापालिकेसमोर निदर्शने

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांसाठी ३०० कोटी रुपयांचे तात्पुरते जंबो रुग्णालय उभारण्याआधी पुणे महापालिकेची सुमारे ८ ते १० बंद असलेली रुग्णालये व कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयु यंत्रणा सुरु करावी, या मागणीसाठी शहरातील विविध संघटनांनी मंगळवारी महापालिकेसमोर निदर्शन केली. या रुग्णालयांनाच सक्षम केल्यास पुणेकरांसाठी कायमस्वरूपी उपयोगी पडतील, असे संघटनांची मागणी आहे. कोरोना काळात आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी विविध लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष राजकीय व सामाजिक संघटना, पक्ष यांनी एकत्र येत कोरोना विरोधी जन अभियान  सुरु केले आहे. शहरांत रुग्णालयांतील खाटा, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे. आॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याच्या कारणास्तव ३०० कोटी रुपये खर्च करुन नवीन जम्बो रुग्णालय उभारले जाणार आहे. पण दुसरीकडे मनपाच्या सर्वात मोठ्या ४५० खाटांच्या कमला नेहरू रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथील आयसीयु सर्व उपकरणे व व्हेंटिलेटरसह सज्ज आहे. पण गेली अनेक वर्षांपासून बंद आहे. त्याचप्रमाणे बांधून तयार असलेली पण वापरात नसलेली मनपाची ८ ते १० रुग्णालये आहेत. तिथे आॅक्सीजन सिलेंडर, खाटा इत्यादी सुविधा देऊन सुरू करायला हवीत. त्यासाठी जम्बो रुग्णालयाला वापरण्यात येणारा निधी द्यावा. जंबो रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका नेमण्यासाठी दाखविली जाणारी राजकीय इच्छाशक्ती मनपाची रुग्णालये सुरु करण्यासाठीही दाखवावी, असे आवाहन करत संघटनांनी निदर्शने केली. या मागण्यांना डॉ. अनंत फडके, डॉ. अभिजित मोरे, डॉ. अरूण गर्दे, किरण मोघे, पौर्णिमा चिकरमाने, सुनिती सु.र. मेधा थत्ते, बाळकृष्ण सावंत, शकुंतला सविता, उदय भट, वर्षा गुप्ते, डॉ. संजय दाभाडे आदींनी पाठिंबा दिला आहे. -------------------सुरू नसलेली रुग्णालये- कर्वेनगर येथील कै बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालय- स्वारगेट जवळील मित्रमंडळ चौकामधील बाळासाहेब ठाकरे रुग्णालय- राजमाता जिजामाता रुग्णालय- येरवडा येथील भल्या मोठ्या राजीव गांधी रुग्णालयाचे वरचे तीन रिकामे मजले- डॉ. कोटणीस रुग्णालयाची जुनी इमारत- कर्णे रुग्णालय----------------

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारcommissionerआयुक्तCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस