जुन्या भांडणाच्या रागातून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या; ४ अटकेत, एक बालक ताब्यात, फुरसुंगी परिसरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:24 IST2026-04-29T15:23:53+5:302026-04-29T15:24:26+5:30

जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी गुंडाच्या लोखंडी धारदार हत्याराने डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर तसेच दोन्ही हातांवर सपासप वार केले

Brutal murder of a gangster from Tadipar; 4 accused arrested, one child in custody, shocking incident in Fursungi area | जुन्या भांडणाच्या रागातून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या; ४ अटकेत, एक बालक ताब्यात, फुरसुंगी परिसरातील धक्कादायक घटना

जुन्या भांडणाच्या रागातून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या; ४ अटकेत, एक बालक ताब्यात, फुरसुंगी परिसरातील धक्कादायक घटना

फुरसुंगी: फुरसुंगी परिसरात जुन्या वादातून एका तडीपार गुंडाची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे नाव आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २६, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे आहे. या प्रकरणी श्रीमती रेखा प्रभाकर कांबळे (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास देशमुख पेट्रोल पंपाच्या मागील परिसरात, रुपीनगर येथे ही घटना घडली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आकाश कांबळे याच्यावर लोखंडी धारदार हत्याराने डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर तसेच दोन्ही हातांवर सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी ओमकार प्रमोद मोरे (वय २३), अरुण अनिल यादव (वय २०), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २१) आणि दत्ता वेंकट गीते (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आदित्य प्रकाश कांबळे (वय २२, रा. खराडी) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश खांडे करत आहेत. दरम्यान, या खूनप्रकरणामुळे फुरसुंगी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

Web Title : पुराने झगड़े में तड़ीपार गुंडे की निर्मम हत्या; चार गिरफ्तार

Web Summary : फुरसुंगी में पुराने झगड़े के कारण एक तड़ीपार गुंडे की हत्या कर दी गई। पुलिस ने एक किशोर सहित चार लोगों को गिरफ्तार किया। आकाश कांबले पर धारदार हथियारों से हमला किया गया था। फरार संदिग्ध को पकड़ने के लिए जांच जारी है।

Web Title : Outcasted Goon Brutally Murdered Over Old Feud; Four Arrested

Web Summary : In Phursungi, an outcasted goon was murdered due to an old feud. Police arrested four people, including a juvenile. The victim, Akash Kamble, was attacked with sharp weapons. Investigations are ongoing to apprehend the absconding suspect.