Corona Vaccination In Pune: शहरात बुधवारी कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 21:13 IST2021-09-28T21:13:33+5:302021-09-28T21:13:41+5:30

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार

Both Covishield and Covacin vaccines are available in the city on Wednesday | Corona Vaccination In Pune: शहरात बुधवारी कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध

Corona Vaccination In Pune: शहरात बुधवारी कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध

पुणे : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर बुधवारी २९ तारखेला प्रत्येकी २०० कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ३०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (६ जुलैपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचा १ सप्टेंबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.

Web Title: Both Covishield and Covacin vaccines are available in the city on Wednesday