शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या हंगामात काळी मैना खातेय भाव; बारामतीत करवंदांना १५० ते १८० रुपये किलो दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:44 IST

डोंगररांगांमधून करवंद गोळा करणे हे श्रमसाध्य काम असल्याने उत्पादन कमी प्रमाणात बाजारात येते.

बारामती : बारामतीत उन्हाळा चांगलाच तापला असताना, फळबाजारात “फळांचा राजा” आंब्यासोबतच रानमेव्याचा राजा मानले जाणारे करवंद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. डोंगराळ भागातून येणारे आंबट-गोड, रसाळ आणि आरोग्यदायी करवंद सध्या नागरिकांच्या ताटात विशेष स्थान मिळवत असून, यंदा त्यांच्या किमतींनीही उच्चांक गाठला आहे. यंदाच्या हंगामात करवंदाचा दर १५० ते १८० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी १२५ ते १५० रुपयांच्या दरम्यान होता. या वाढीमागे प्रमुख कारण म्हणजे मर्यादित आवक आणि वाढती मागणी. डोंगररांगांमधून करवंद गोळा करणे हे श्रमसाध्य काम असल्याने उत्पादन कमी प्रमाणात बाजारात येते. सध्या बारामतीत दररोज सुमारे ५० ते ७० क्रेट्स एवढी आवक होत आहे.

डाेंगर रांगातून येणारी आंबट-गोड चवीची डोंगरची काळी मैना नागरिकांना आकर्षित करत आहे. नैसर्गिकरीत्या मिळणारे हे फळ आरोग्यासाठी लाभदायक मानले जात असल्याने शहरात त्याला चांगली मागणी निर्माण झाली आहे. विशेषतः महिला व लहान मुलांमध्ये या फळाबाबत अधिक आकर्षण दिसून येत आहे. उन्हाळ्यात ताजेतवाने चव देणारे आणि थोडे आंबट-गोड असलेले करवंद खाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. स्थानिक विक्रेते कमलेश वाडिले विक्रेत्याच्या मते, दररोज आणलेला माल एक ते दोन दिवसांतच संपून जातो. डोंगराळ भागातून मोठ्या कष्टाने हे फळ गोळा करून बाजारात आणले जाते. सध्या बारामतीमध्ये ५० ते ७० क्रेट आवक होत आहे.

त्यामुळे उपलब्धता मर्यादित असून, मागणी मात्र अधिक असल्याने दरही तुलनेने जास्त आहेत. दरम्यान, करवंदाची चटणी, लोणचे तसेच सरबत तयार करण्यासाठीही नागरिक या फळाची खरेदी करत असल्याचे चित्र सध्या बारामतीत पाहायला मिळत आहे. आंब्याच्या हंगामात रानमेव्याला देखील मागणी कायम आहे. करवंदामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि पचनास मदत करणारे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे उष्माघातापासून संरक्षण, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Karonda prices soar in Baramati amidst mango season demand.

Web Summary : In Baramati, Karonda prices reach ₹180/kg due to limited supply and high demand. This wild berry, rich in Vitamin C and antioxidants, is popular for its health benefits and unique flavor, attracting locals during summer.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेfruitsफळेMaharashtraमहाराष्ट्र