कात्रज भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; धडक देऊन पसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 09:16 IST2026-02-19T09:16:43+5:302026-02-19T09:16:53+5:30

दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर धडक देणारा पसार झाला आहे

Biker dies in accident in Katraj area; Case registered against bike rider who hit him and fled | कात्रज भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; धडक देऊन पसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

कात्रज भागात अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; धडक देऊन पसार दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल

पुणे : कात्रज भागात दुचाकीस्वाराचा अपघातातमृत्यू झाल्याची घटना घडली. दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आशिष सिद्धेश्वर तोडकरी (वय ४८, रा. पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत गणेश सिद्धेश्वर तोडकरी (वय ४४, रा. पर्वती) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष तोडकरी हे कात्रज भागात कामाला आहेत. आशिष आणि त्यांचे मालक गोकुळ जावळकर हे १२ फेब्रुवारी रोजी कात्रजमधील मांगडेवाडी परिसरात गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार आशिष आणि सहप्रवासी गोकुळ हे कात्रज परिसरातून निघाले होते. समोरून आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने दुचाकीस्वार आशिष यांना धडक दिली. अपघातात आशिष गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलिस निरीक्षक मुलाणी पुढील तपास करत आहेत.

 

Web Title : कात्रज दुर्घटना: बाइक सवार की मौत, टक्कर मारकर भागने वाला सवार तलाश

Web Summary : कात्रज में आशीष तोडकरी नाम के एक बाइक सवार की मौत हो गई। टक्कर मारने वाला बाइक सवार मौके से फरार हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। तोडकरी का सह-यात्री भी घायल हो गया।

Web Title : Katraj Accident: Biker Dies, Hit-and-Run Rider Sought by Police

Web Summary : A biker, Ashish Todkari, died in Katraj after being hit by another biker who fled the scene. Police have registered a case and are investigating the hit-and-run. Todkari's co-passenger was also injured.