शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

Big Breaking : पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रमकुमार नवे आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 20:22 IST

अवघ्या तीन महिन्यातच पालिका आयुक्त पदावरून उचलबांगडी

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची अवघ्या तीन महिन्यातच शनिवारी ( दि . ११) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार हे नवीन महापालिका आयुक्त असणार आहे. 

शेखर गायकवाड यांना पुणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार स्वीकारून अवघे तीन महिनेच उलटले होते. त्यांनी सौरभ राव यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन संदर्भात त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. आता पुन्हा एकदा गायकवाड हे साखर आयुक्त म्हणून काम पाहणार आहे.

विक्रम कुमार हे २००४ च्या आयएएस अधिकारी आहेत. पीएमआरडीएचे तात्कालीन आयुक्त किरण गित्ते यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता. आता ते पुणे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहे. त्यांच्यासमोर पुुणे शहरात वेगाने फोफावत चाललेली कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्याजागी कृषी आयुक्त असलेले सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली आहे. पाचवे अधिकारी जितेंद्र दुडी यांची मंचर उपविभागीय उप जिल्हाधिकारी पदावरून सांगली जिल्हापरिषदेच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  पुण्याचे साखर आयुक्त असलेले सौरभ राव यांना पुण्याचे विशेष अधिकारी, विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तTransferबदली