शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Breaking: मोठी बातमी...! पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये अपघात, ५० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर धडकले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:45 IST

Bajaj Pune Grand Cycle Tour Accident news: पुण्यातील मुळशी कोळवण रोडवर ग्रँड चॅलेंज सायकल टूरमध्ये मोठा अपघात. अरुंद रस्त्यामुळे ७० हून अधिक सायकलपटू जखमी. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा.

पुणे: पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक मोठी घटना आज मुळशी तालुक्यात घडली. 'पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर' दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला. यामध्ये ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले असून अनेक खेळाडू जखमी झाले आहेत.

मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातामुळे अनेक खेळाडू ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेले.

प्राथमिक माहितीनुसार, अनेक खेळाडू किरकोळ जखमी झाले असून ४ ते ५ खेळाडूंना दुखापत झाल्याने तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच साधारण १५ मिनिटांच्या ब्रेकनंतर ही रेस पुन्हा सुरु करण्यात आली. 

प्रशासनाच्या नियोजनावर संतापआंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आयोजित करताना जिल्हा प्रशासनाने रस्त्यांच्या स्थितीचा विचार केला नव्हता का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोळवण रोडवरील अरुंद भागाची माहिती खेळाडूंना आधीच देण्यात आली नव्हती, असा आरोप होत आहे. वळणावर सुरक्षेसाठी आवश्यक असणारी बॅरिकेडिंग किंवा धोक्याच्या सूचना देणारे फलक कमी असल्याचे दिसून आले. तुम्ही ही सायकल स्पर्धा जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Grand Cycle Tour Crash: Over 50 Cyclists Injured

Web Summary : Over 70 cyclists crashed during the Pune Grand Challenge Cycle Tour near Mulshi due to a narrow road. Many sustained injuries, with several hospitalized. Questions arise regarding the district administration's planning and safety measures on the route.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात