शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भाजपला मोठा धक्का; पाच पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, हाती घेतली तुतारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:57 IST

हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी भागातून भाजपच्या ५ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला

पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक पक्षांना धक्के बसू लागले आहेत. पुण्यातही भाजपला मोठा धक्का बसला आहे. हडपसर, वडगाव शेरी, धनकवडी भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी ५ पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात घडलेल्या या राजकीय घडामोडीने चर्चाना उधाण आलं आहे.    

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, साधना बँकेचे माजी संचालक अनिल तुपे हे हडपसर मतदार संघातील, वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे, त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असा शब्द दिला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार या पक्षाचे जिल्हा प्रतोद रामभाऊ भोकरे यांनी देखील शरदराव पवार पक्षामध्ये प्रवेश केला.  पुण्यात आज शरद पवारांची सभा

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता माळवाडी येथील महापालिकेच्या नाट्यगृहासमोर जाहीर सभा होणार आहे. 

हडपसर- वडगाव शेरीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार 

हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार आहे. अशातच या दोन्ही मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती