मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात अपेक्षेप्रमाणे धावांची अक्षरश: बरसात झाली. मुंबई इंडियन्सनं घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना रायन रिकल्टनच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर २४३ धावा करत सनरायझर्ससमोर २४४ धावांचे टार्गेट सेट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन चेंडूत दोन विकेट्स
या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड यांनी धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. दोघांनी शतकी भागीदारी रचली. MI साठी ही जोडी डोकेदुखी ठरत असताना अल्लाह गझनफर याने आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने ९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्माच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. त्याने २४ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी केली. अभिषेकनं ट्रविस हेडच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ५२ चेंडूत १२९ धावांची भागीदारी रचली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या ईशान किशनला तर त्याने खातेही उघडू दिले नाही.
MI च्या सलामीच्या नव्या प्रयोगात ‘विल पॉवर’ दिसली; पण सूर्यकुमार यादव पुन्हा फेल
कोण आहे अल्लाह गझनफर?
अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू अल्लाह गझनफर हा उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलच्या मिनी लिलावात त्याच्यासाठी तब्बल ४.८ कोटी रुपये मोजले होते. २० वर्षीय खेळाडूनं अल्पावधित आपल्या फिरकीतील जादू दाखवून अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय संघाकडून पदार्पण केल्याचेही पाहायला मिळाले होते. मिस्ट्री स्पिनरच्या रुपात छाप सोडणाऱ्या गझनफरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली होती. मात्र, अफगाणिस्तानचा माजी कर्णधार दौलत अहमदझाई यांनी त्याला मिस्ट्री स्पिनरमध्ये रूपांतरित केलं. या निर्णयामुळे त्याच्या कारकिर्दीला मोठं वळण मिळालं.
Web Summary : In the MI vs SRH match, Ghazanfar dismissed Sharma (45) and Kishan (0). MI scored 243, with Riculton's century. Head and Sharma's partnership threatened before Ghazanfar's intervention. Ghazanfar, an Afghan spinner, was bought for ₹4.8 crore.
Web Summary : मुंबई इंडियंस बनाम सनराइजर्स हैदराबाद मैच में, गज़नफर ने शर्मा (45) और किशन (0) को आउट किया। रिकल्टन के शतक से मुंबई इंडियंस ने 243 रन बनाए। हेड और शर्मा की साझेदारी को गज़नफर ने तोड़ा। गज़नफर को 4.8 करोड़ रुपये में खरीदा गया।