Ryan Rickelton Fastest 100 For Mumbai Indians In IPL : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रायन रिकल्टन याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विक्रमी शतक साजरे केले. तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना त्याने ४४ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या शतकाला गवसणी घातली. मुंबई इंडियन्सकडून हे सर्वात जलद शतक ठरले. या खेळीसह रायन रिकल्टन याने तिलक वर्मा आणि सनथ जयसूर्या यांचा विक्रम मोडीत काढला. या दोघांनी MI कडून ४५ चेंडूत शतक झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाकावर बसवल्याचा शतक ठोकून काढला राग
रायन रिकल्टन याने यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ४३ चेंडूत ८१ धावांची धमाकेदार खेळी करत MI ला १३ वर्षांनी सलामीचा सामना जिंकून देण्यात महत्त्वपू्ण भूमिका बजावली होती. पण त्यानंतर पुढच्या चार सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध केलेल्या ३७ धावा वगळता दिल्ली कॅपिटल्स ९ (४), राजस्थान रॉयल्स ८ (४) आणि पंजाब किंग्स विरुद्ध २ (८) तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. त्यामुळे त्याला बाकावर बसवून क्विंटन डी कॉकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. त्याने शतक ठोकत धामकेदार सुरुवात केल्यावर रायन रिकल्टनसाठी कमबॅकचा मार्ग जवळपास मुश्किलच झाला होता. पण दुखापतीमुळ क्विंटन बाहेर गेल्यावर त्याला पुन्हा एक संधी मिळाली. बाकावर बसवल्याचा राग काढत त्याने या संधीच सोनं करून दाखवलं.
MI च्या सलामीच्या नव्या प्रयोगात ‘विल पॉवर’ दिसली; पण सूर्यकुमार यादव पुन्हा फेल
मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद शतक करणारे आघाडीचे ५ फलंदाज
- ४४ चेंडू – रायन रिकल्टन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (२०२६)
- ४५ चेंडू – सनथ जयसूर्या विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (२००८)
- ४५ चेंडू – तिलक वर्मा विरुद्ध गुजरात टायटन्स (२०२६)
- ४७ चेंडू – कॅमेरून ग्रीन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (२०२३)
- ४९ चेंडू – सूर्यकुमार यादव विरुद्ध गुजरात टायटन्स (२०२३)
Web Summary : Ryan Rickelton hit a blistering 44-ball century against Sunrisers Hyderabad at Wankhede, breaking the Mumbai Indians record for the fastest IPL hundred. He surpassed Tilak Varma and Sanath Jayasuriya's previous record of 45 balls.
Web Summary : वानखेड़े में रियान रिकेल्टन ने सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ 44 गेंदों में शानदार शतक बनाया, जो मुंबई इंडियंस के लिए सबसे तेज आईपीएल शतक का रिकॉर्ड है। उन्होंने तिलक वर्मा और सनथ जयसूर्या के 45 गेंदों के पिछले रिकॉर्ड को तोड़ा।