शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 22:03 IST

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल, असा दावा केला आहे. तसेच भाजपला किती जागा मिळतील? यासंदर्भातही मोठी भविष्यवाणी केली आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आज थांबली. आज येथे दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यापूर्वी, २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १५२ जागांवर मतदान झाले होते. महत्वाचे म्हणजे, किरकोळ घटना वगळता, यावेळी येथे हिंसाचार दिसून आला नाही. लोक उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडले आणि त्यांनी विक्रमी मतदान केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या टप्प्यात ९१ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यानंतर आता, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल, असा दावा केला आहे. तसेच भाजपला किती जागा मिळतील? यासंदर्भातही मोठी भविष्यवाणी केली आहे.

काय म्हणाले सुवेंदू अधिकारी? -मतदानानंतर प्रतिक्रिया देताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, "राज्यातील जनतेने परिवर्तनासाठी मतदान केले आहे. हिंदू मतदारांनी पहिल्यांदाच उघडपणे बाहेर पडत मतदान केले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. ममता बॅनर्जी यांनी दिवसभर केंद्रीय सुरक्षा दलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. गुजराती-मारवाडी वस्तीत गुंडांच्या मदतीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला." 

एवढेच नाही तर, "भवानीपूरमध्ये आपण २० हजार मतांनी जिंकत आहोत ८ पैकी ७ वॉर्डांत आपली आघाडी असेल आणि भाजप १८० पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करेल," असे भाकितही त्यांनी केले.

"ही निवडणूक बंगालला 'पश्चिम बांगलादेश' होण्यापासून रोखण्यासाठी होती" -पश्चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य म्हणाले, "बंगालच्या जनतेने अशी निवडणूक कधीच बघितली नाही. ते अतिशय उत्साहाने या  निवडणुकीत सहभागी झाले होते. ही निवडणूक कुणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी, कुण्या पक्षाला सत्तेबाहेर करण्यासाठी अथवा कुण्या पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी नव्हती, तर ही निवडणूक बंगालला 'पश्चिम बांगलादेश' होण्यापासून रोखण्यासाठी होती. हा हिंदू बंगाली आणि राष्ट्रवादी मुस्लिमांच्या अस्तित्वाचा लढा होता." 

तसेच, "निवडणूक संपुष्टात आली आहे. अद्याप कसल्याही प्रकारच्या जीवीत अथवा वित्त हाणीचे वृत्त नाही. अशा प्रकारे निवडणूक पार पडणे, आमच्यासाठी एक मोठा मुद्दा आहे. तृणमूल काँग्रेस सत्तेबार जाणे निश्चित आहे," असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Suvendu Adhikari claims Mamata Banerjee will lose by 20,000 votes!

Web Summary : Suvendu Adhikari predicts Mamata Banerjee's defeat in Bhawanipore by 20,000 votes. He also forecasts BJP winning over 180 seats. BJP state president Samik Bhattacharya stated this election was to save Bengal.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण