शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 21:10 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर (CRPF) गंभीर आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान बुधवारी (२९ एप्रिल २०२६) पार पडले. १४२ जागांसाटी ही दुसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. दरम्यान, भवानीपूरमध्ये मतदान केल्यानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर (CRPF) गंभीर आरोप करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "मी १९८४ पासून निवडणुका लढवत आहे. मात्र, यावेळी होतोय तसा छळ कधीही बघितला नाही," ममतांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? -ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी १९८४ पासून निवडणुका लढवत आहे. मात्र, यावेळी ज्या पद्धतीने छळ होत आहे, तसा छळ कधी बघितला नाही. केंद्रीय दलाचे लोक आणि सेंट्रल ऑब्सर्वर मारहाण करत आहेत. त्यांनी महिला आणि लहान मुलांनाही सोडले नाही. सीआरपीएफ अशा पद्धतीने लोकांना त्रास देऊ शकत नाही. हे लोक सीमेचे रक्षण करण्याऐवजी एका राजकीय पक्षाचे रक्षण करत आहेत." 

एवढेच नाही तर, "राणाघाट, कल्याणी आणि आरामबाग यांसारख्या ठिकाणी एजंट्सना बाहेर काढण्यात आले. हा स्वतंत्र आणि निष्पक्ष लोकशाहीचा अपमान आहे." दरम्यान, त्यांनी विजयाची खात्री देत 'विक्ट्री साइन'ही दाखवले.

"आता हिंदू जागा झाला आहेत" -तसेच, दुसऱ्या बाजूला, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममतांच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "घुसखोर आणि काही विशिष्ट लोक गोंधळ करत आहेत. पण आता हिंदू जागा झाला आहेत." महत्वाचे म्हणजे, भवानीपूरमधील चक्रबेरिया येथील एका मतदान केंद्रावर ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी एकाच वेळी दाखल झाले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

बगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. १४२ जागांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee alleges harassment, confident of victory in Bengal election.

Web Summary : Mamata Banerjee, contesting since 1984, alleges central forces harassed voters during West Bengal elections. She accuses them of favoring a political party and mistreating citizens. BJP's Suvendu Adhikari claims Hindus are now awakened. Banerjee expressed confidence with a victory sign.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाWest Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६