टेक विश्वात सध्या चर्चा सुरू आहे ती AI तंत्रज्ञानाची. या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक कंपन्यांमध्ये एक विचित्र विरोधाभास बघायला मिळत आहे. मेटा आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या एका बाजूला हजारो कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला याच कंपन्या 'एआय' (AI) तंत्रज्ञानावर अब्जावधी डॉलर्स खर्च करतानाही दिसत आहेत. यामुळे एआय लवकरच मानवाची जागा घेईल, असा समज फोफावत आहे. मात्र, प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच आहे. 'एनव्हिडिया' (Nvidia) सारख्या दिग्गज टेक कंपनीने यासंदर्भात महत्वाचे भाष्य केले आहे.
आज एआय चालवण्याचा खर्च कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे, अर्थात एआयच्या तुलनेत मानव फार स्वस्त आहे, असे एनव्हिडियाने म्हटले आहे. एनव्हिडियाचे उपाध्यक्ष ब्रायन कटनजारो यांच्या मते, त्यांच्या टीमसाठी कर्मचाऱ्यांपेक्षेही अधिक खर्च एआयसाठे येतो. एमआयटीच्या (MIT) संशोधनातूनही ही बाब स्पष्टही झाली आहे. सध्या केवळ २३% 'व्हिजन-आधारित' कामांमध्येच एआय वापरणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे, तर उर्वरित ७७% प्रकरणांमध्ये आजही मानवी कर्मचारीच स्वस्त पडत आहेत.
महत्वाचे म्हणजे, उपरोक्त परिस्थितीतही टेक कंपन्यांनी यावर्षी एआयच्या पायाभूत सुविधांवर ७४० अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च करण्याची घोषणा केली आहे, हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६९% एवढा अधिक आहे. वाढत्या खर्चामुळे उबरसारख्या कंपन्यांचे बजेटही कोलमडले आहे.
असे असले तरी, तज्ज्ञांच्या मते, भविष्यात एआय मॉडेल्सचा खर्च ९० टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. भविष्यात एआय वापरानुसार पैसे मोजावे लागतील. महत्वाचे म्हणजे, हे तंत्रज्ञान जेव्हा स्वस्त आणि त्रुटीमुक्त होईल, तेव्हाच ते मानवाची जागा घेऊ शकेल. मात्र, सध्या तरी मानवी कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च एआयच्या तुलनेत फार कमी आहे.
Web Summary : Despite massive AI investment, NVIDIA reveals AI is currently far more expensive than human labor. Vision-based AI is cost-effective in only 23% of cases. Experts predict AI costs will drop, but humans are currently cheaper.
Web Summary : भारी एआई निवेश के बावजूद, NVIDIA का कहना है कि एआई अभी भी मानव श्रम से महंगा है। केवल 23% मामलों में ही विजन-आधारित एआई लागत प्रभावी है। विशेषज्ञों का अनुमान है कि एआई की लागत घटेगी, लेकिन फिलहाल मानव सस्ते हैं।