नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या गणपती मंदिर परिसराजवळील पूनम आकांक्षा इमारतीत बुधवारी दुपारी एका तरुणाने आपल्या प्रेयसीची आणि तिच्या आईची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्या तरुणाने स्वतः ही गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे विरार परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील मोरेगावात राहत असलेला शिवम उपाध्याय (२७) याचे प्रेयसी नॅन्सी मिश्रा (२४) सोबत प्रेमसंबंध होते. आपल्या लग्नाची चर्चा करण्यासाठी विरार पश्चिम येथील पूनम आकांक्षा इमारतीत सदनिका क्रमांक ३०१ मध्ये आला होता. तिथे त्याची प्रेयसी नॅन्सी आणि तिची आई सरिता मिश्रा (४८) उपस्थित होत्या.
आईने लग्नाला विरोध केल्यावर तिघांमध्ये जोरदार वाद झाला, असे सांगण्यात येत आहे. वाद विकोपाला गेला आणि आरोपी शिवमने पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला व घरातील चाकूने आई आणि मुलीवर निर्घृणपणे हल्ला केला. या हल्ल्यात दोघींवरही अनेक वेळा वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने ब्लेडने स्वतःचा गळा कापून स्वतःलाही जखमी केले.
घटनेदरम्यान फ्लॅटमध्ये जोरदार झटापट झाली, ज्यामुळे खिडकीची काचही फुटली. गोंधळ ऐकून जवळच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या बोळींज पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने खिडकीतून फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे, तर जखमी आरोपीला तात्काळ जवळच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील दोन वर्षांपासून आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्याला लग्नाचे स्वरूप देण्यासाठी आरोपी मंगळवारी रात्री आपल्या नातेवाईकांसह नॅन्सीच्या घरी गेला होता. मात्र, या विवाहाला नॅन्सीच्या आईने विरोध दर्शविला आणि नॅन्सीनेही लग्नास नकार दिला. याच रागातून संतप्त झालेल्या आरोपीने बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धारदार हत्यार घेऊन नॅन्सीच्या घरात प्रवेश केला आणि नॅन्सी व तिच्या आईवर सपासप वार करत त्यांची हत्या केली. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह पुढील तपासासाठी शवविच्छेदनास पाठवले असून या दुहेरी हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. बोळींज पोलिसांनी या प्रकरणी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली आहे. तरी या दुहेरी हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहे.
Web Summary : In Virar, a man murdered his girlfriend and her mother after his marriage proposal was rejected. He then attempted suicide by cutting his own throat. Police are investigating the double homicide, suspecting unrequited love as the motive.
Web Summary : विरार में, एक व्यक्ति ने शादी के प्रस्ताव को अस्वीकार करने के बाद अपनी प्रेमिका और उसकी माँ की हत्या कर दी। फिर उसने अपना गला काटकर आत्महत्या करने की कोशिश की। पुलिस दोहरे हत्याकांड की जांच कर रही है, उन्हें एकतरफा प्यार का संदेह है।