कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडणाऱ्या आई आणि एक वर्षीय बाळाला आरपीएफ जवानाने वाचविले. आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.
२८ एप्रिल रोजी सायंकाळी धावत्या ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या महिला आणि तिच्या एक वर्षीय बाळाला आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तत्काळ धाव घेत सुरक्षित वाचवले. प्रवासी महिला अंतिमा शुक्ला आपल्या एक वर्षीय मुलगा सर्वज्ञ शुक्ला याच्यासह प्रयागराज ते मुंबई असा प्रवास करत होती.
ट्रेन कल्याण स्थानकात येत असताना महिलेने उतरण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती बाळासह प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मधील जागेत घसरली. मात्र तेथे कर्तव्यावर असलेले आरपीएळ जवान हेमंत भरगुडे यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. घटनेचा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Web Summary : An RPF jawan's alertness saved a mother and her one-year-old child from falling under a train at Kalyan station. ASI Hemant Bhargude swiftly rescued them as they slipped while disembarking a moving train. The incident was captured on CCTV.
Web Summary : कल्याण स्टेशन पर आरपीएफ जवान की सतर्कता से एक माँ और उसके एक वर्षीय बच्चे को ट्रेन के नीचे आने से बचाया गया। एएसआई हेमंत भारगुडे ने चलती ट्रेन से उतरते समय फिसलने पर तुरंत उन्हें बचाया। घटना सीसीटीवी में कैद हो गई।