पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. यातच, डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील फाल्टा भागात मोठा राडा झाला आहे. येथे ईव्हीएम मशीनवरील भाजपच्या पर्यायासमोर टेप लावण्यात आल्याची तक्रार भाजपने केला आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या या गंभीर तक्रारीची दखल घेत, निवडणूक आयोगही अॅक्शन मोडवर आला असून, "ज्या पोलिंग बूथवर, ईव्हीएमच्या बटणावर टेप आढळून येईल, तेथे फेरमतदान घेतले जाईल, असे पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) मनोज अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. या वादानंतर अनेक केंद्रांवरील मतदान तात्पुरते थांबवण्यात आले होते.यासंदर्भात, भाजपचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर करत या प्रकाराला 'डायमंड हार्बर मॉडेल', असे म्हटले आहे. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या फाल्टा येथील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना पक्षाचा उमेदवार निवडण्यापासून रोखले जात आहे. अनेक मतदान केंद्रांवर भाजपचा पर्याय टेपने झाकण्यात आला होते.
तृणमूल काँग्रेसने भाजपचा आरोप फेटाळून लावला -एवढेच नाही तर, "हे तथाकथित 'डायमंड हार्बर मॉडेल' आहे, याच पद्धतीमुळे ममता बॅनर्जी यांचे भाचे, अभिषेक बॅनर्जी यांना त्यांची लोकसभा सीट वाचवण्यात मदत झाली," असेहीम मालवीय यांनी म्हटले आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने भाजपच्या चिन्हावर टेप लावल्याचा दावा फेटाळून लावला असून, पराभव समोर दिसत असल्याने भाजप विनाकारण गोंधळ घालत असल्याचे म्हटले आहे.
फाल्टा मतदारसंघात भाजपने, तृणमूल काँग्रेसच्या पन्ना लाल हलदर यांच्या विरोधात दीपक कुमार हलदर यांना मैदानात उतरवले आहे. आज पश्चिम बंगालमधील १४२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे.
Web Summary : West Bengal's second phase witnessed chaos in Falta as BJP alleged their EVM button was taped. Re-polling is indicated. BJP accuses TMC of foul play. TMC denies and claims BJP is creating confusion due to fear of defeat.
Web Summary : पश्चिम बंगाल के दूसरे चरण में फाल्टा में अराजकता देखी गई क्योंकि बीजेपी ने आरोप लगाया कि उनके ईवीएम बटन पर टेप लगा था। पुनर्मतदान के संकेत। बीजेपी ने टीएमसी पर बेईमानी का आरोप लगाया। टीएमसी ने इनकार किया और कहा कि बीजेपी हार के डर से भ्रम पैदा कर रही है।