मुंबई इंडियन्स IPL च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. २०१० च्या हंगामात पहिल्यांदा प्लेऑफ्स खेळणाऱ्या MI नं ६ फायनल खेळताना २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० च्या हंगामात या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
प्लेऑफ्सची आस संपल्याचे चित्र निर्माण झाल्यावर दमदार कमबॅक करून जेतेपद पटकावल्याचा पराक्रमही मुंबई इंडियन्सनं करुन दाखवला आहे. त्यामुळेच MI च्या संघाला IPL मधील कमबॅक किंग मानले जाते. यंदाच्या हंगामता संघ आपला ता रुबाब पुन्हा दाखवून देणार का? ते पाहण्याजोगे असेल. मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंतच्या १८ हंगामात ११ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. इथं जाणून घेऊयात त्यांचा प्लेऑफ्समधील खास रेकॉर्ड
२०१० च्या हंगामात MI नं पहिल्यांदा प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारल्यावर फायनल खेळली होती. १४ पैकी १० सामने जिंकून त्यांनी अव्वल स्थान पटकावले. सेमीफायनलमध्ये RCB वर ३५ धावांनी मात करत त्यांनी पहिली IPL फायनल गाठली. मात्र अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
२०११ च्या हंगामात १४ पैकी ९ सामने जिंकत MI प्लेऑफ्स गाठली. एलिमिनेटरमध्ये KKR ला ४ विकेट्सनी पराभूत केल्यावर क्वालिफायर २ मध्ये RCB विरुद्ध MI ला ४३ धावांनी पराभववाचा सामना करावा लागला अन् या हंगामात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
२०१२ मध्ये १६ पैकी १० सामने जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला. पण या हंगामात त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
२०१३ हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने १६ पैकी ११ सामने जिंकत प्लेऑफ्स गाठली. या हंगामातच MI नं फायनलमध्ये CSK ला पराभूत करत पहिले वहिले जेतेपद पटकावले.
२०१४ च्या हंगामात १४ पैकी ७ विजयासह MI नं प्लेऑप्स खेळली होती. त्यानंतर २०१५ मध्ये १४ पैकी ८ सामन्यातील विजयासह प्लेऑफ्स गाठल्यावर या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने IPL स्पर्धेतील दुसरे जेतेपद पटकावले होते.
२०१६ च्या हंगामात प्लेऑफ्सला मुकल्यावर २०१७ च्या हंगामात दमदार कमबॅक करत मुंबई इंडियन्सच्या संघाने पुणे सुपरजाएंट्स संघाविरुद्धच्या फायनलमध्ये एका धावेसह विजय नोंदवत तिसरे जेतेपद पटकावले.
२०१८ च्या हंगामात प्लेऑप्समध्ये पोहचण्यात अपात्र ठरल्यावर २०१९ मध्ये पुन्हा एकदा दमदार कमबॅक करत चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत MI नं चौथ्यांदा जेतेपद पटकावले.