शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 19:12 IST

Kerala Exit Poll 2026: केरळ विधानसभा निवडणूक २०२६ एक्झिट पोल: ॲक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार केरळमध्ये काँग्रेस आघाडीची (UDF) सत्ता येणार. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना धक्का बसण्याची शक्यता.

केरळ विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असले तरी, त्यापूर्वी आलेल्या 'ॲक्सिस माय इंडिया' च्या एक्झिट पोलने डाव्यांच्या गोटात अस्वस्थता पसरवली आहे. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची आपली जुनी परंपरा जनता कायम ठेवणार असल्याचे या कलानुसार दिसत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीला ७८ ते ९० जागा मिळण्याचा मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करून इतिहास रचण्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे. सत्ताधारी LDF आघाडीला केवळ ४९ ते ६२ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपने जोरदार प्रयत्न करूनही त्यांना केरळमध्ये केवळ ० ते ३ जागांवर समाधान मानावे लागू शकते.

विक्रमी मतदानाचा कल कुणाकडे?९ एप्रिल रोजी केरळमधील सर्व १४० जागांसाठी मतदान झाले होते. यावेळी ७८.२७ टक्के इतके विक्रमी मतदान झाले असून, १९७७ नंतरचे हे दुसरे सर्वात मोठे मतदान ठरले आहे. या प्रचंड मतदानाचा फायदा थेट विरोधी पक्ष असलेल्या UDF ला मिळताना दिसत आहे. विशेषतः महिला मतदारांचा कल सत्तांतराच्या बाजूने असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एक्झिट पोलचा 'यूडीएफ'वर विश्वासकेवळ 'ॲक्सिस माय इंडिया'च नव्हे, तर 'पीपुल्स पल्स' आणि 'मॅट्रिझ' यांसारख्या इतर संस्थांनीही केरळमध्ये काँग्रेस आघाडीचेच (UDF) सरकार येईल, असा कल दिला आहे. त्यामुळे ४ मे रोजी केरळमध्ये खरोखरच 'हात' चालणार की 'विळा-हातोडा' आपली सत्ता टिकवणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala Exit Polls: UDF Surges, Vijayan's 'Hat-trick' in Doubt?

Web Summary : Exit polls predict a significant UDF win in Kerala, potentially ending Chief Minister Vijayan's hopes for a consecutive term. High voter turnout, especially among women, favors the Congress-led alliance. Other polls echo this trend, suggesting a possible shift in power.
टॅग्स :Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2026