उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशीच एका तरुणीचा भीषण अपघातातमृत्यू झाला. भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने या तरुणीला आपला जीव गमवावा लागला. ज्या घरात लग्नाच्या सनई-चौघड्यांचा आवाज घुमत होता, तिथे आता शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरकोठी गावातील एका तरुणीचं लग्न ठरलं होतं आणि मंगळवारी तिच्या घरी वरात येणार होती. घरात उत्सवाचं वातावरण होतं, पाहुण्यांची ये-जा सुरू होती आणि लग्नाला अवघे काही तास बाकी होते. याच दरम्यान लग्नासाठी तयार होण्याकरिता ही तरुणी जवळच असलेल्या एका ब्युटी पार्लरमध्ये जात होती. मात्र, हा प्रवास तिच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
ट्रेलरने दिली जोरदार धडक
तरुणी बरियारपूर चौकाजवळ रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रेलरने तिला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तरुणीचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून पालकांनी टाहो फोडला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Web Summary : A bride-to-be in Uttar Pradesh died in a road accident on her wedding day while going to a beauty parlor. A speeding trailer hit her, turning joyous celebrations into mourning. Police are investigating.
Web Summary : उत्तर प्रदेश में शादी के दिन ब्यूटी पार्लर जा रही दुल्हन की सड़क हादसे में मौत हो गई। तेज रफ्तार ट्रेलर ने टक्कर मार दी, जिससे खुशियां मातम में बदल गईं। पुलिस जांच कर रही है।