शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:52 IST

Ethanol Blending India : भारत सरकारने E85 आणि E100 इंधनासाठी नवीन नियमांचा मसुदा जाहीर केला आहे. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होणार असून इंधन दरातही मोठी घट होणार आहे.

वाढत्या पेट्रोलच्या किमती आणि परदेशातून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी भारत सरकारने आता एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत आता देशात E85 आणि E100 यांसारख्या उच्च इथेनॉल मिश्रित इंधनांना अधिकृत मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे E85 आणि E100 इंधन?इथेनॉल हे ऊस, मका आणि खराब झालेल्या तांदळापासून तयार केलेले बायोफ्यूल आहे. E85 या इंधनात ८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोलचे मिश्रण असते. तर E100 हे पूर्णपणे शुद्ध बायोफ्यूल असून यात १००% इथेनॉलचा वापर केला जातो (०% पेट्रोल).

खिशाला मिळणार मोठा दिलासापेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलची निर्मिती स्वस्त पडते. अंदाजानुसार, १००% इथेनॉल इंधन (E100) प्रति लिटर ६० ते ७० रुपये दराने उपलब्ध होऊ शकते. यामुळे सर्वसामान्यांच्या इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी 'फ्लेक्स फ्युएल' इंजिन असलेल्या वाहनांचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर आहे.

आयात अवलंबित्व होणार कमीभारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. आता पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या अनिश्चित पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारला इंधनाच्या बाबतीत 'आत्मनिर्भर' व्हायचे आहे. या नवीन नियमांमुळे भारताच्या जैवइंधन कार्यक्रमाला मोठी गती मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India to run vehicles on 100% ethanol; new 'E100' plan.

Web Summary : India promotes E100 fuel, aiming for self-reliance and cheaper fuel. E100, made from ethanol, could cost ₹60-70/liter. This reduces import dependency.
टॅग्स :Petrolपेट्रोलFuel Crisisइंधन टंचाई