छत्तीसगडमधील विलासपूर येथील एक लग्नसोहळा सध्या समाजात चर्चेचा विषय ठरला आहे. वधू आणि वर पक्षामध्ये लग्नामुळे आनंदाचं वातावरण असतानाच वराने केलेल्या एका चुकीमुळे लग्नघरात मोठा वाद झाला. त्याचं झालं असं की, लग्नासाठी येताना नवरदेव मद्यप्राशन करून आला. त्यामुळे वरात दारात पोहोचली असतानाच कारमधून उतरताना नवरदेवाचे पाय लटपटले. हे पाहून संतापलेल्या वधून तिथल्या तिथेच लग्न मोडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या लग्नाची जय्यत तयारी दोन्ही पक्षांनी केली होती. डीजेच्या तालावर नाचत मौजमस्ती करत वरात लग्नघरात पोहोचली होती. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. मद्यप्राशन करून आलेला नवरदेव जसा कारमधून उतरला तसे त्याचे पाय लटपटू लागले. त्याची ही अवस्था बघून वधू पक्षाच्या तोंडचं पाणी पळालं. नवरदेव मद्यप्राशन करून आल्याचे वधूला समजले. त्यानंतर तिने क्षणाचाही विलंब न लावता लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीसोबत सप्तपदी चालणार नाही असे तिने ठणकावून सांगितले. त्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. बघता बघता तणाव वाढला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनीही दोन्ही पक्षांचा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाम निश्चय केलेल्या वधूने लग्नास नकार दिल्याने वरासह वऱ्हाडी मंडळींना लग्नाविनाच माघारी परतावे लागले.
Web Summary : In Chhattisgarh, a bride called off her wedding after the groom arrived drunk and stumbled while exiting the car. Upset by his condition, she refused to marry him, leading to a dispute and police intervention. The groom and his party returned without the wedding taking place.
Web Summary : छत्तीसगढ़ में एक दूल्हा नशे में पहुँचा और लड़खड़ा गया, जिससे नाराज़ दुल्हन ने शादी तोड़ दी। उसने शराबी व्यक्ति से शादी करने से इनकार कर दिया, जिसके कारण विवाद हुआ और पुलिस को हस्तक्षेप करना पड़ा। दूल्हा और बाराती बिना शादी के लौट गए।