शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:42 IST

Abhishek Banerjee Rafale, West Bengal Assembly Election 2026: "ज्या गोष्टी पाकिस्तानाविरोधात करायला हव्या, त्या बंगालमध्ये सुरू आहेत"

Abhishek Banerjee Rafale, West Bengal Assembly Election 2026:  पश्चिम बंगालमधील १४२ विधानसभा जागांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने आठ जिल्ह्यांमध्ये केंद्रीय दलाच्या २,३२१ कंपन्या आणि अनेक निरीक्षक तैनात केले आहेत. मात्र, या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे तृणमूल काँग्रेस तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी उपहासाने म्हटले आहे की, आता प्रशासनाने बंगालमध्ये राफेल विमाने तैनात करणे हाच एक पर्याय शिल्लक ठेवला आहे.

हे पाकिस्तानसाठी करायला हवं होतं...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी उपहासाने म्हणाले, "बंगालमध्ये फक्त राफेल विमाने तैनात करायची शिल्लक राहिली आहेत. आयएनएस युद्धनौकादेखील अजून तैनात करायच्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी एवढी मोठी फौज तैनात केली आहे. जी तैनाती पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध करायला हवी होती, ती बंगालच्या लोकांसाठी केली जात आहे," असा टोला त्यांनी लगावला. मुख्य निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधत अभिषेक म्हणाले, "निवडणुका अशा प्रकारे घेतल्या जातात का? ज्ञानेश कुमार, तुम्हाला हव्या त्या उमेदवाराला उभे करा. आम्ही ही निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकू. इतकंच नाही, तर तृणमूल काँग्रेस यावेळी २०२१ पेक्षा जास्त जागा जिंकेल."

निवडणुका अशा प्रकारे घेतल्या जातात का?- ममतादीदी

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील टीएमसीच्या उमेदवार ममता बॅनर्जी म्हणाल्या, "बाहेरून खूप निरीक्षक आले आहेत. भाजप जे सांगेल ते ते आयोगाचे लोक करत आहेत. जरा आजूबाजूला बघा, आमचे सर्व पोस्टर्स काढण्यात आले आहेत. निवडणुका अशा प्रकारे घेतल्या जातात का? मतदार मतदान करतील, पोलीस किंवा सुरक्षा दलाची इथे गरज नाही. अलीकडेच काही नवीन लोकांना आणले गेले आणि ते त्यांना जे हवे ते करत आहेत. ते दहशतवाद पसरवत आहेत," असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bengal Elections: Banerjee Slams Deployment, Says 'Only Rafale Left'

Web Summary : Abhishek Banerjee criticizes heavy security in Bengal elections, sarcastically suggesting Rafale deployment. He accuses the Election Commission of favoring BJP, while Mamata Banerjee alleges biased observers and poster removal, questioning election fairness.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीRafale Dealराफेल डीलElectionनिवडणूक 2026