शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:30 IST

Beed Massajog Sarpanch By Election Result 2026: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे.

Swarupanand Deshmukh Massajog New Sarpanch: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे रिक्त झालेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख (Swarupanand Deshmukh) यांनी अश्विनी देशमुख यांना ९२ मतांनी पराभूत केले आहे.

संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावच्या सरपंचपदाची निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अश्विनी देशमुख यांच्याविरोधात स्वरूपानंद देशमुख हे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. 

स्वरूपानंद यांचा गेल्या निवडणुकीत पराभव

दरम्यान, मागील निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यावेळी मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. आज झालेल्या मतमोजणीत पहिल्याच फेरीत आघाडी घेत स्वरूपानंद देशमुख यांनी सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत अश्विनी देशमुख यांनी आघाडी मिळवली होती. मात्र निर्णायक ठरलेल्या तिसऱ्या फेरीत मोठी आघाडी घेत स्वरूपानंद देशमुख यांनी विजय निश्चित केला. अखेरीस स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा अटीतटीच्या लढतीत ९२ मतांनी पराभव करत मस्साजोगचं सरपंचपद पटकावलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Massajog Upset: Slain Sarpanch's Wife Loses Election

Web Summary : In a shocking turn, Ashwini Deshmukh, wife of murdered Sarpanch Santosh Deshmukh, lost the Massajog by-election in Beed. Swarupanand Deshmukh defeated her by 92 votes in the contest for the vacant Sarpanch post.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026sarpanchसरपंचBeedबीडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणMaharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६