शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:57 IST

जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ एकाच जागी जमतात, तेव्हा सत्तेच्या रांगेतील एका मंत्र्याला गुप्त ठिकाणी लपवून ठेवलं जातं

गेल्या शनिवारी वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये जे घडलं, त्याने व्हाइट हाऊसची झोप उडवली आहे. जर तो माथेफिरू हॉटेलमधील सर्वच बड्या नेत्यांना ठार मारण्यात यशस्वी ठरला असता तर अमेरिकेचे सरकार चालवायला एकही नेता उरला नसता.  व्हाइट हाउसच्या नजरेतून अनेक संभाव्य शक्यतांकडे दुर्लक्ष झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. म्हणून आता गोपनीय ‘प्लॅन बी’वर व्हाइट हाउसची तयारी सुरू आहे.

चिंतेची बाब काय? -  शनिवारी वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये पत्रकारांचा कार्यक्रम सुरू होता, तेव्हा ट्रम्प यांच्याबरोबर वरच्या यादीतील ५ पैकी ४ महत्त्वाचे नेते हजर होते! जर तेथे काही अघटित घडले असते, तर अमेरिकेचे संपूर्ण नेतृत्व एका क्षणात संपले असते. याला नेतृत्वहीन करणारा हल्ला (डिकॅपिटेशन स्ट्राइक) म्हणतात.

अमेरिकी सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ एकाच जागी जमतात, तेव्हा सत्तेच्या रांगेतील एका मंत्र्याला गुप्त ठिकाणी लपवून ठेवलं जातं. त्याला 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणतात. त्या व्यक्तीला अण्वस्त्रांचे कोड्स आणि सुरक्षेचा ताफा दिला जातो. जर मुख्य कार्यक्रमावर हल्ला झाला, आणि त्या हल्ल्यात वर उल्लेख केलेले महत्त्वाचे नेते ठार झाले तर हा लपवलेला व्यक्ती आपोआप अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष बनतो.

गंमत बघा : शनिवारी असा कोणीही 'एक' व्यक्ती ठरवला नव्हता, कारण अनेक मंत्री सुट्टीवर असल्याने ते आधीच वेगवेगळ्या शहरात होते. व्हाइट हाऊसच्या सुरक्षा यंत्रणांना आपण सुरक्षित आहोत असे वाटले. पण हल्लेखोर हॉटेलमध्ये राहात होता. त्याने सुरक्षा यंत्रणांना हूल दिलीच. 

सीक्रेट सर्व्हिसच्या नियमात बदलव्हाइट हाऊसची सुरक्षा यंत्रणा आता एक नवा नियम आणण्याच्या तयारीत आहेएकत्र प्रवास बंदी : यापुढे राष्ट्राध्यक्ष (ट्रम्प) आणि उपराष्ट्राध्यक्ष (वान्स) एकाच कार्यक्रमात किंवा एकाच विमानात दिसण्याची शक्यता कमी आहे.नवी जागा : हॉटेलच्या बॉलरूमऐवजी अधिक सुरक्षित सरकारी इमारतींमध्ये असे कार्यक्रम घेण्यासंदर्भात नियम आणला जात आहे.

ट्रम्प यांचे अनेक संभाव्य दौरे : ४ जुलै २०२६ मध्ये अमेरिका आपल्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याचबरोबर अमेरिकेत यंदा मध्यावधी निवडणुकाही असल्याने देशभर जिकडे तिकडे मोठे सोहळे, कार्यक्रम, प्रचार सभा होणार आहेत. ट्रम्प यांना जनतेमध्ये जायला आवडते, पण त्यांच्या व अन्य नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'सीक्रेट सर्व्हिस'ला हाय अलर्टवर राहावे लागेल.

English
हिंदी सारांश
Web Title : White House Alert: Shooting Raises 'Designated Survivor' Questions, Security Changes

Web Summary : A shooting near Trump sparked White House security concerns, revealing vulnerabilities. The 'Designated Survivor' plan, ensuring government continuity, gains renewed importance. Expect stricter security measures for future events, including travel restrictions for top leaders.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प