पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ साठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सध्या सुरू आहे. मतदानाची सुरुवात सकाळी ७ वाजता झाली. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावत आहेत. मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बाली विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर मशीन खराब झाल्यामुळे मतदार संतप्त झाले. येथील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, सुरक्षादलाला लाठीचार्ज करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, बाली विधानसभा क्षेत्रातील 'डॉन बोस्को लिलुआ सोहनलाल विद्यालय' येथील मतदान केंद्रावर मशीन खराब झाल्यामुळे मतदार आक्रमक झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीचार्ज केला, ज्यामध्ये काही मतदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना बूथ क्रमांक १५२, १५३ आणि १५४ वर घडली. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले असून, त्यात लोकांना उचलून बाहेर नेलं जात असल्याचं पाहायला मिळत आहेत.
ईव्हीएम खराब झाल्याच्या तक्रारी
इतरही अनेक ठिकाणी ईव्हीएम खराब झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील महेशतल्ला (१५५ विधानसभा क्षेत्र) येथील गोपाळपूर प्राथमिक शाळेतील बूथ क्रमांक ६५ वर अडीच तास उलटूनही मतदान सुरू होऊ शकलं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजल्यापासून मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.
हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना
या व्यतिरिक्त छपरा, शांतिपूर आणि भांगर यांसारख्या अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. एंटाली मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांची मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली. त्यांच्या प्रतिनिधीला मतदान केंद्राबाहेर काढल्यामुळे हा वाद उद्भवला होता. मतदान केंद्र खूप लहान असल्याने प्रतिनिधीला बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याचं समजतं.
छपरा येथे भाजपा नेत्यावर हल्ला
नादिया जिल्ह्यातील छपरा येथील मतदान केंद्र क्रमांक ५३ वर तृणमूल काँग्रेसशी संबंधित कार्यकर्त्यांनी भाजपाच्या एका नेत्यावर हल्ला केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जखमी कार्यकर्ता मोशारेफ मीर याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीर यांनी दावा केला आहे की, टीएमसीच्या अनेक कार्यकर्त्यांनी, ज्यांपैकी एकाकडे बंदूक होती, त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना लोखंडी सळईने मारहाण केली.
Web Summary : West Bengal's election saw EVM malfunctions, sparking voter anger and police action. Violence erupted in several areas, including an attack on a BJP leader. Voting was delayed at some booths due to technical issues, leading to confrontations and arrests.
Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव में ईवीएम में खराबी के कारण मतदाताओं का गुस्सा फूटा और पुलिस कार्रवाई हुई। कई क्षेत्रों में हिंसा भड़क उठी, जिसमें भाजपा नेता पर हमला भी शामिल है। तकनीकी खराबी के कारण कुछ बूथों पर मतदान में देरी हुई, जिससे टकराव और गिरफ्तारियां हुईं।