पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान एक गंभीर आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसने (TMC) बोगस मतदान करण्यासाठी ७५० खोटी बोटं खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एका बोटाचा फोटो दाखवत हा त्याचा नमुना असल्याचं सांगितलं. मात्र सत्ताधारी पक्षाने भवानीपूर मतदारसंघाबाबत केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
सुवेंदु अधिकारी यांनी दावा केला की, नगरसेवकांनी बोगस मतदान करण्यासाठी ७०० हून अधिक खोटी बोटं खरेदी केली आहेत. भवानीपूरमधील ही लढत अत्यंत चर्चेत आहे, कारण येथे अधिकारी यांची थेट लढत राज्याच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी आहे. "आम्ही टीएमसीचे हे प्रकार सहन करणार नाही. खोट्या बोटांच्या साह्याने निवडणुकीत फेरफार करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत" असं त्यांनी ठामपणे सांगितलं. सुवेंदु अधिकारी हे नंदीग्राममधूनही निवडणूक लढवत असून ते तिथले विद्यमान भाजपा आमदार आहेत.
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
भाजपाचे काही नेते आधीपासूनच असा दावा करत होते की, बंगालमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा गोंधळ घालण्यासाठी बोटांना सिलिकॉन किंवा अत्तर लावण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. सुवेंदु अधिकारी यांनी आणखी एक दावा केला की, भवानीपूरमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) मार्फत वाटण्यात आलेल्या ३,८१० बूथ स्लिप्स न वाटताच परत आल्या आहेत. ते म्हणाले, "अशा मतदारांची यादी चिन्हांकित करण्यात आली आहे. भवानीपूरमधील जनता बदल घडवण्यासाठी तयार आहे आणि आपल्या मताद्वारे ते याचं चोख उत्तर देतील."
फ्रान्सहून आला मतदार
मतदान करण्यासाठी आले असताना सुवेंदु अधिकारी म्हणाले की, काल कालीघाट येथे त्यांना एक व्यक्ती भेटली जी मतदानासाठी थेट फ्रान्सहून आली होती. त्यांनी जास्तीत जास्त लोकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज १४२ जागांवर (एकूण २९४ जागांपैकी) मतदान होत आहे.
Web Summary : Suvendu Adhikari accuses TMC of buying 750 fake fingers for bogus voting in Bhawanipur. He claims नगरसेवकांनी purchased them for voter fraud. Adhikari also alleges irregularities in booth slips distribution. He urged people to vote.
Web Summary : शुभेंदु अधिकारी ने टीएमसी पर भवानीपुर में फर्जी मतदान के लिए 750 नकली उंगलियां खरीदने का आरोप लगाया। उन्होंने दावा किया कि पार्षदों ने मतदाता धोखाधड़ी के लिए खरीदा। अधिकारी ने बूथ स्लिप वितरण में अनियमितताओं का भी आरोप लगाया। उन्होंने लोगों से मतदान करने का आग्रह किया।