Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:58 IST

Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. २९ एप्रिल, बुधवार रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारात घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु देशांतर्गत कमोडिटी बाजार 'एमसीएक्स' (MCX) वर बाजार उघडल्यानंतर सोने आणि चांदीचे भाव वाढले. मात्र काही वेळानंतर पुन्हा किरकोळ घसरण सुरू झाली. आज सोन्याची किंमत १,५०,०७७ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,४३,६०० रुपये प्रति किलोवर आली.

किमतीत किती बदल झाला?

मंगळवार, २८ एप्रिल रोजी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,४९,९१८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४२,४९९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोने १५९ रुपयांनी आणि चांदी १,१०१ रुपयांनी महागली आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे कमोडिटी बाजारातील हा बदल पुढेही पाहायला मिळू शकतो. सोन्या-चांदीच्या किमतीत आधीच मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसत आहेत. जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत कमोडिटी बाजारात ही अस्थिरता कायम राहू शकते.

शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर

लग्नसराईत मोठ्या घसरणीची प्रतीक्षा

भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत मध्यमवर्गीय कुटुंबं अजूनही सोन्या-चांदीच्या किमतीत मोठ्या घसरणीची प्रतीक्षा करत आहेत. मध्यपूर्वेतील तणाव सुरू होण्यापूर्वीच किमतीत मोठी वाढ झाली होती, त्यानंतर आता दिसत असलेला किरकोळ दबाव त्या तेजीला भरून काढण्यास पुरेसा ठरत नाहीये.

काय आहे नवी किंमत?

दिल्ली: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. याशिवाय २२ कॅरेट सोन्याचा दर १,३८,९०० रुपये आणि १८ कॅरेटचा दर १,१३,६८० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

मुंबई: २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५१,३७० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३८,७५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १,१३,५३० रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

हैदराबाद: २४ कॅरेट सोन्याचा रेट १,५१,३७० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३८,७५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१३,५३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

चेन्नई: आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५३,८१० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,९९० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१७,५९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

कोलकाता: आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५१,३७० रुपये, २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३८,७५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१३,५३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

बंगळुरू: आज २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५१,३७० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर १,१४,७५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,३८,७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

चांदीचा भाव

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूमध्ये आज एक किलो चांदीची किंमत २,६०,००० रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ही किंमत २,६४,९०० रुपये प्रति किलो झालीये.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Rise Amid Wedding Season Demand.

Web Summary : Gold and silver prices increased, with silver surging by ₹1101. Instability persists due to Middle East tensions and fluctuating crude oil prices. Families await price drops during the wedding season. New rates announced for major cities.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक