शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर

By दीपक भातुसे | Updated: April 29, 2026 09:24 IST

पूर्व छाननी प्रक्रियेचे काम ६६ टक्के पूर्ण, बूथ आणि मतदार वाढल्याने शहरांची दमछाक

दीपक भातुसे मुंबई - राज्यातील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी हाती घेतलेल्या मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमातील (एसआयआर) पूर्व छाननी प्रक्रियेत (मॅपिंग) महाराष्ट्राने ६६.४२ टक्के प्रगती साधली आहे. मात्र, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे यासारख्या शहरी जिल्ह्यांमध्ये मॅपिंगचे ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. तर गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्याने मात्र ९०.५१ टक्के काम पूर्ण करून राज्यात आघाडी घेतली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांनी ८० ते ९० टक्के मॅपिंग पूर्ण केले आहे, तर १३ जिल्ह्यांमध्ये ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर आणि लोकसंख्या वाढीमुळे मतदान केंद्रांची (बूथ) संख्या वाढल्याने शहरी भागात कामाचा वेग कमी झाला आहे.

कसे सुरू आहे मॅपिंग?राज्यातील एकूण ९.८८ कोटी मतदारांपैकी सुमारे ६.५६ कोटी मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. एसआयआर पूर्व प्रक्रियेत ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) सध्याच्या मतदार यादीची २००२ साली निवडणूक आयोगाने तयार केलेल्या यादीशी पडताळणी करीत आहेत. सध्याच्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत असणे आवश्यक आहे. सध्या ही प्रक्रिया बीएलओ प्रत्यक्ष लोकांच्या घरी न जाता त्यांच्याकडील मतदार यादींच्या पडताळणीद्वारे करीत आहेत. ज्या नव्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत नसतील, त्यांना त्यांच्या पालकांची नावे त्या यादीत असल्याचे पुरावे सादर करावे लागतील; पण, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून तशा सूचना जारी केल्या जाणार आहेत.

आवश्यक कागदपत्रानंतर पुढील प्रक्रिया पार पडणारदरम्यान, एसआयआर पूर्व मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष एसआयआरच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मात्र हा कार्यक्रम कधीपासून सुरू होईल ते अद्याप निश्चित व्हायचे असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष एसआयआरचे वेळापत्रक आणि त्यासाठी मतदारांकडून कोणती आवश्यक कागदपत्रे घ्यायची याची स्पष्टता आल्यानंतरच पुढील प्रक्रिया ठरवली जाणार आहे. मात्र मतदारांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli leads voter list mapping; Mumbai, Pune, Nagpur lag behind.

Web Summary : Maharashtra's voter list revision shows Gadchiroli leading with 90.51% mapping. Urban districts like Mumbai, Pune, and Thane lag behind due to migration and increased polling booths. The process involves BLO verification against the 2002 list, requiring proof for new voters.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग