शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 08:26 IST

Gujarat Local Body Election 2026: गुजरातमधील काही ठिकाणी लागलेल्या आश्चर्यकारक निकालांची आकडेवारी आता समोर येत आहे. यामध्ये गोध्रा येथील एका प्रभागात लागलेल्या निकालाची चर्चा होत आहे. मुस्लिमबहूल आणि तब्बल ९७ मुस्लिम मतदार असलेल्या या प्रभागातून अपक्ष हिंदू महिला विजयी झाली आहे.

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काल लागलेल्या निकालांमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यातील १५ पैकी १५ महानगरपालिकांसोबतच बहुतांश नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. यादरम्यान, राज्यातील काही ठिकाणी लागलेल्या आश्चर्यकारक निकालांची आकडेवारी आता समोर येत आहे. यामध्ये गोध्रा येथील एका प्रभागात लागलेल्या निकालाची चर्चा होत आहे. मुस्लिमबहूल आणि तब्बल ९७ मुस्लिम मतदार असलेल्या या प्रभागातून अपक्ष हिंदू महिला विजयी झाली आहे.

गोध्रामध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. मात्र भाजपाच्या या विजयापेक्षा गोध्रामधील प्रभाग क्रमांक ७ मध्ये लागलेल्या निकालाचीच अधिक चर्चा होत आहे. तसेच या निकालाने राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तब्बल ९७ टक्के मुस्लिम मतदार असलेल्या या प्रभागातून अपेक्षाबेन सोनी या अपक्ष महिला उमेदवाराने विजय मिळवला आहे.

कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाच्या पाठबळाविना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना अपेक्षाबेन सोनी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी मिळवलेला हा विजय राजकीय यशासोबतच सामाजिक सौहार्द आणि परस्पर विश्वासाचं प्रतीक मानलं जात आहे. एवढंच नाही. तर निकाल लागल्यानंतर मुस्लिम समाजातील लोकांनी अपेक्षा सोनी यांची त्यांच्या वडिलांच्या फोटोसोबत मिरवणूक काढून विजयाचा आनंदही साजरा केला. या निकालामुळे मतदार हे जात धर्म न पाहता विकास आणि वैयक्तिक चांगल्या प्रतिमेच्या उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचे अधोरेखित झाले आहे.   

टॅग्स :GujaratगुजरातElectionनिवडणूक 2026