शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:27 IST

राज्यभर ‘ट्रिपिंग’च्या तक्रारी वाढल्या, उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर झाला आहे.

नागपूर - राज्यात एप्रिलच्या अखेरीसच भीषण उष्णतेमुळे वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून ती ३२ हजार मेगावॉटच्या पुढे गेली आहे. मात्र, याच काळात औष्णिक वीज केंद्रांतील तीन युनिट्स बंद पडले असून, पाण्याअभावी जलविद्युत प्रकल्पांची क्षमता घटली आहे, परिणामी उत्पादनात मोठी घट झाल्याने राज्यात वीज संकटाची चाहूल लागली आहे. यामुळे चिंता वाढली आहे.

लोडशेडिंग नाही - महावितरण

महावितरणने राज्यात लोडशेडिंग होणार नसल्याचा दावा केला आहे. वाढत्या मागणीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार अल्पकालीन वीज खरेदीही केली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे ५५ रुग्ण

राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. एकूण ५५ उष्माघातग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत १७ रुग्ण नोंदविण्यात आले होते. याच कालावधीत दोन मृत्यूंची नोंद झाली असली, तरी त्या मृत्यूंचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने साशंकता व्यक्त होत आहे.

पाणी व गॅस टंचाईचा बसणार फटका

उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर झाला आहे. २,५८०.२ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांकडून २१४ मेगावॉट वीज निर्मिती होत होती, तर चार प्रकल्प पूर्णपणे बंद होते. याशिवाय, ४३२ मेगावॉट क्षमतेच्या उरण गॅस प्रकल्पातून गॅसअभावी केवळ २६८ मेगावॉट उत्पादन होत आहे.

राज्यात मागणी जास्त, पुरवठा मात्र कमी

मंगळवारी राज्यातील वीज मागणी २९,५१ मेगावॉट इतकी होती, तर उत्पादन फक्त १७,८९८ मेगावॉट होते. महाजेनकोच्या ताप विद्युत केंद्रांकडून केवळ ६,०८४ मेगावॉट वीज निर्मिती होत होती. कोराडी (६६० मेगावॉट), नाशिक (२१० मेगावॉट), चंद्रपूर (५०० मेगावॉट) येथील प्रत्येकी एक युनिट बंद होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Severe Heat Wave Sparks Power Crisis; Demand Surges, Production Dips

Web Summary : Maharashtra faces a power crisis due to extreme heat, causing a surge in demand and a drop in electricity production. Thermal units are down, and water scarcity impacts hydroelectric output. Despite this, authorities claim no load shedding will occur. Heatstroke cases are rising.
टॅग्स :Power ShutdownभारनियमनHeatwaveउष्णतेची लाट