शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:45 IST

सध्या विमान इंधनाचा दर हा प्रति किलोमीटर तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत वाढल्याची बाब या संघटनेने निदर्शनास आणून दिली

मुंबई - अमेरिका-इराण युद्धामुळे विमान इंधनाचे दर वाढले आहेत. परिणामी, विमान उद्योगावर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी देशातील विमान कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने केली आहे. केंद्राने तातडीने दिलासा दिला नाही तर कंपन्यांना देशातील तसेच परदेशातील काही मार्गांवरील सेवा बंद करावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

केंद्राने तातडीने विमान इंधनावरील ११ टक्के अबकारी करात सूट द्यावी तसेच काही राज्यांत असलेल्या मूल्यवर्धित करात सूट द्यावी, असे संस्थेने सुचविले आहे. विमान इंधनाचा दर  प्रतिकिलोमीटर दोन लाख रुपयांपर्यंत वाढल्याचेही निदर्शनास आणले आहे.

इंधनावरील खर्च ३० वरून ६० टक्क्यांवर पोहोचला

सध्या विमान इंधनाचा दर हा प्रति किलोमीटर तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत वाढल्याची बाब या संघटनेने निदर्शनास आणून दिली. या व्यवसायात विमान इंधनावर ३० ते ४० टक्क्यांच्या आसपास खर्च होतो. सध्या इंधनावरचा हा खर्च ५५ ते ६० टक्क्यांवर गेला आहे. याचा परिणाम, कंपन्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यावर होत आहे. परिणामी, या दरवाढीला पायबंद घालण्याची या कंपन्यांनी केंद्राला साकडे घातले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Airlines fear shutdown, seek government aid as costs double.

Web Summary : Indian airlines face a crisis due to soaring fuel prices fueled by geopolitical tensions. The Federation of Indian Airlines urges the government to cut excise duty and VAT on fuel. Without relief, airlines may halt domestic and international routes, as fuel costs now comprise 60% of expenses.
टॅग्स :airplaneविमानUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरCentral Governmentकेंद्र सरकार