IPL २०२६ च्या हंगामात रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघातील सलामी जोडी ही सर्वात लक्षवेधी ठरते. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं बहुतांश सामन्यात संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिल्याचे पाहायला मिळाले. आता फिनिशरच्या रुपात दोन नव्या हिरोंनी मैफील लुटली आहे. राजस्थान रॉयल्स यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सला पराभूत करणारा पहिला संघ ठरला. संघाच्या विजयात दक्षिण आफ्रिकेचा डोनोव्हन फरेरा याने आपला 'बाहुबली' अवतार दाखवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RR च्या नव्या हिरोसंदर्भातील खास गोष्ट
२०० च्या स्ट्राईक रेटसह नाबाद अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला विजय मिळवून दिल्यावर फरेरानं उत्तम साथ देणाऱ्या विदर्भकर शुभम दुबेमुळे माझ्यावरील दडपण कमी झाले, ही गोष्टही सांगितली. पण तुम्हाला माहितीये का? या पठ्ठ्यानं CSK फ्रँचायझीकडून खेळताना टी-२० जगतात खास छाप सोडलीये. एवढेच नाही तर IPL पदार्पणात त्याचा घोर अपमान झाला होता. यंदाच्या हंगामात तोच चेहरा RR चा बाहुबली होऊन IPL स्पर्धा गाजवताना दिसत आहे. इथं जाणून घेऊयात CSK vs MI फ्रँचायझी लढतीत त्याने केलेल्या विक्रमी कामगिरीसह RR चा नवा हिरो होऊन चर्चेत येण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाची गोष्ट
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
कोण आहे डोनोव्हन फरेरा?
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील डोनोव्हन फरेरा हा दक्षिण आफ्रिकेचा उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ स्पिनर आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जाणारा हा स्टार विकेटमागची जबाबदारीही पार पाडू शकतो. २१ जुलै १९९८ मध्ये प्रिटोरिया येथे जन्मलेल्या या पठ्ठाला राष्ट्रीय संघाकडून फारशी संधी मिळालेली नाही. पण वेगवेगळ्या लीगमध्ये त्याने १०० हून अधिक टी-२० सामने खेळले आहेत.
CSK vs MI फ्रँचायझी संघातील सामन्यात केलाय मोठा धमाका!
डोनोव्हन फरेरा याने २०२५ च्या अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायीच्या टेक्सस सुपर किंग्स संघाकडून खेळताना मुंबई इंडियन्स फ्रँचायझी MI न्यूयॉकविरुद् MILC स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. फाफ ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखालील खेळताना त्याने १८ चेंडूत अर्धतक झळकावले होते. जे या स्पर्धेतील संयुक्तरित्या सर्वात जलद अर्धशतक ठरले. पगार वाढला, पण फक्त एकच संधी !
२०२३ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सच्या संघाने २५ लाख मूळ किंमत असलेल्या डोनोव्हन फरेराला ५० लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील केले. २०२४ च्या हंगामात त्याला फक्त दोन सामन्यात संधी मिळाली. RR नं रिलीज केल्यावर तो ७५ लाखांसह तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सामील झाला. पगार वाढला, पण इथं त्याला एकाच सामन्यात संधी मिळाली. IPL मधील हा काळ त्याच्यासाठी संघर्षाचाच होता. पण यंदाच्या हंगामात RR नं भरवसा दाखवत दिलेल्या संधीचं सोनं करताना त्याने पंजाब किंग्सविरुद्ध IPL कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. याआधी सनरायर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ६९ धावांची खेळी केली होती. ही आयपीएलमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
Web Summary : Donovan Ferreira, once with CSK, now shines for RR. His impactful half-century against Punjab Kings highlights his T20 prowess. Earlier, he smashed a record-breaking fifty in the American league playing for CSK franchise, showcasing his potential despite limited IPL opportunities.
Web Summary : कभी CSK के साथ रहे डोनोवन फरेरा अब RR के लिए चमके। पंजाब किंग्स के खिलाफ उनका अर्धशतक उनकी T20 क्षमता को दर्शाता है। इससे पहले, उन्होंने CSK फ्रैंचाइज़ी के लिए खेलते हुए अमेरिकी लीग में रिकॉर्ड तोड़ अर्धशतक बनाया, जो IPL में सीमित अवसरों के बावजूद उनकी क्षमता को दर्शाता है।