बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या अक्षय कुमार 'व्हील ऑफ फॉर्च्युन' नावाचा शो होस्ट करत आहे. या शोमधील अक्षयचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय हाय हिल्स घालून डान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे.
अक्षय कुमारच्या 'व्हील ऑफ फॉर्च्युन'मध्ये जॅकलीन फर्नांडिस, भूमी पेडणेकर आणि फराह खान सहभागी झाल्या होत्या. या शोमध्ये जॅकलीनने अक्षय कुमारला एक टास्क दिला होता. हाय हिल्स घालून अक्षयसा १ मिनिट स्टेजवर डान्स करायचा होता. जर अक्षय डान्स करताना मध्ये थांबला तर त्याला १ लाख रुपये द्यावे लागतील, असं चॅलेंज जॅकलीनने अभिनेत्याला दिलं होतं. सुरुवातीला अक्षय कुमार थोडा घाबरला होता. तो जॅकलीनला म्हणाला, "वेडी आहेस का? पाय मुरगळेल...मी हे याआधी कधीही केलेलं नाही". त्यानंतर अक्षयने लाल रंगाचे हाय हिल्स घालून 'लालपरी' या गाण्यावर डान्स केला.
Akshay dancing with heels wasn't in my 2026 bingo card 🤣by u/shawerma114 in BollyBlindsNGossip
अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, अक्षय त्याच्या 'भूत बंगला' सिनेमामुळे चर्चेत आहे. हॉरर कॉमेडी असलेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमात अक्षयसोबत मिथिला पालकर मुख्य भूमिकेत आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने १९५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
Web Summary : Akshay Kumar, hosting 'Wheel of Fortune,' danced in high heels after a challenge from Jacqueline Fernandez. He performed on 'Laal Pari' to avoid a ₹1 lakh penalty. The video is viral. His film 'Bhoot Bangla' is also a box office success.
Web Summary : अक्षय कुमार, 'व्हील ऑफ फॉर्च्यून' होस्ट करते हुए, जैकलीन फर्नांडीज की चुनौती पर हाई हील्स में नाचे। ₹1 लाख के जुर्माने से बचने के लिए उन्होंने 'लाल परी' पर प्रदर्शन किया। वीडियो वायरल है। उनकी फिल्म 'भूत बंगला' भी सफल है।